
बीड(प्रतिनिधी) संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये बुधवारी पहिली सुनावणी झाली. केज कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडली. पुढची सुनावणी बीडच्या कोर्टात होण्याची शक्यता आहे. तशी मागणी सरकारी पक्षाने कोर्टाकडे केली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव पहिल्या दिवशीची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली.पुढील सुनावणी २६ मार्च रोजी होणार आहे.सुनावणीला सुरुवात झाली त्यावेळी कोर्टाने सर्व आरोपींना काही प्रश्न विचारले. वकील मिळाले आहेत का? चार्जशीट मिळाली आहे का? असे प्रश्न कोर्टाने विचारले. त्यावर आरोपींना ‘हो’ म्हणत उत्तर दिलं. याशिवाय तपासाबद्दलही कोर्टाने फिर्यादी पक्षाला विचारलं. तपासावर काही आक्षेप आहेत का? हा प्रश्न विचारला असता फिर्यादी शिवराज देशमुख यांनी ‘नाही’ म्हटलं.

सुरुवातीला आरोपींची ओळख परेड झाली. कोर्टाने आरोपींना हात वर करायला सांगितलं होतं. इतर आरोपींनी हात वर केले. परंतु वाल्मिक कराडने तसं केलं नाही. त्याने कोर्टाला हात जोडले. त्याच्या कृतीमागे नेमकं कारण काय? हे समजू शकलं नाही. वाल्मिक कराडसह इतर आरोपी ऑनलाईन पद्धतीने सुनावणीसाठी हजर होते. या प्रकरणाची पुढची सुनावणी २६ मार्च रोजी होणार आहे.
आरोपींच्या वकिलांनी केल्या तीन मागण्या
१. आरोपपत्रामध्ये फोन कॉल्सचा उल्लेख आहे. खंडणी, हत्या या काळातले सीडीआर तपास यंत्रणांना मिळालालेले आहेत. मात्र ते सीडीआर आम्हाला देण्यात यावेत.
२. आरोपपत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसचा उल्लेख आहे. परंतु त्याचे पुरावे आरोपींच्या वकिलांना मिळालेले नाहीत, ते देण्यात यावेत.
३. कलम १६४ प्रमाणे साक्षीदारांचे जबाब झालेले आहेत आणि कलम १८ प्रमाणे आरोपींचे जबाब नोंदवले गेलेले आहेत. ते जबाब मिळावेत.
संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आणखी एक एफआयआर दाखल होणार आहे, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. सोशल मीडियातील माहितीच्या आधारावर त्यांनी हे सांगितलं. ज्यांनी आरोपींना पोसलं, ज्यांनी आरोपींना आर्थिक मदत केली आणि ज्यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली, त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे तपास यंत्रणांनी कोर्टाकडे दोषारोपपत्र सादर केलेलं असलं तरी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचा हक्क अबाधित ठेवला आहे. या प्रकरणाचा आणखी तपास सुरु असल्याची माहिती आहे. कोर्टामध्ये सरकारी पक्षाची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम हे मांडणार आहे. मात्र पहिल्या दिवशीच्या सुनावणीला निकम हे गैरहजर होते.
या सुनावणीला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील न्यायालयात उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व आरोपी व्हीसीद्वारे कोर्टात उपस्थित होते. यावेळी बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांच्या सीडीआरची मागणी करण्यात आली. तसेच आरोपीचे जबाब मिळाले नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील राहुल मुंडेंनी केला. यानंतर वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी बाजू मांडली. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी देखील युक्तिवाद केला. २६ मार्चला सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडेल, असं सांगण्यात आले. यानंतर न्यायालयाने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी २६मार्चला होणार असल्याचे सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पहिली सुनावणी, न्यायालयात काय काय घडलं?
आरोपीचे जबाब मिळाले नसल्याचा वकील राहुल मुंडेंचा युक्तिवाद
डिजिटल पुराव्यांचा आरोपपत्रात उल्लेख, सीडीआरची बचाव पक्षाची मागणी
सुनावणीला धनंजय देशमुखही कोर्टात उपस्थित
वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे बाजू मांडली. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे ही कोर्टात उपस्थित होते.
शिवराज देशमुख यांना कोर्टा समोर उभे केले..
शिवराज देशमुख यांनी फिर्याद दिली होती..
संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी शिवराज देशमुख त्यांच्यासोबत होते.
सुदर्शन घुलेचे वकील अनंत तिडके काय म्हणाले?
साक्षीदारांचे जवाब चार्जशीमध्ये नाही.
आरोपीचे जवाब मिळालेले नाहीत.
जर जवाब घेतले गेले आहेत तर साक्षीदारांचे कलम १६४ चे जवाब का दिले गेले नाहीत
आरोपीचे वकील राहुल मुंडे काय म्हणाले?
डिजिटल एविडन्सचा चार्जशीटमध्ये उल्लेख आहे पण त्याचे व्हिडिओ तसेच आरोपीच्या ज्या फोन कॉलचा उल्लेख करण्यात आलेला आहे ते सीडीआर आम्हाला देण्यात यावेत.
सरकारी वकील काय म्हणाले?
पुढच्या तारखेला आमचे म्हणणे कोर्टात मांडू…
सरकारी पक्षाकडून जे द्यायचा आहे तो पुढच्या सुनावणीच्या वेळी देऊ
२६मार्चला सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडेल…ही तारीख द्यावी अशी सरकारी वकिलाची मागणी
साक्षीदार आणि आरोपींचे जवाब मिळण्यासाठी इतका उशीर का? करता असा प्रश्न आरोपीचे वकील विचाराले.
२६ मार्चला होणार पुढील सुनावणी होणार आहे…
सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडचे वकील काय म्हणाले?
न्यायालयात या कामाचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. त्या दोषारोप पत्रात बरेच कागदपत्रे आहे, ते आरोपींना मिळणं गरजेचं आहे, त्यायबत आज आम्ही मागणी केली आहे, ते पुढच्या सुनावणीमध्ये मिळतील, असं वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी सांगितले.