• Contact Us
  • Home
Saturday, June 7, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

संदीप क्षीरसागरांकडून पुन्हा अजितदादांची भेट

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
February 16, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

जुन्नर दि.१६ (प्रतिनिधी):- बीड शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आताही रविवारी (दि.१६) रोजी जुन्नर येथे आ.संदीप क्षीरसागर यांनी दुसर्‍यांदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची याच संदर्भात भेट घेतली.बीड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजना आणि बिंदुसरा धरण आणि माजलगाव बॅकवॉटरमध्ये पाण्याची पुरेशी उपलब्धता आहे. मात्र नगरपालिकेकडे महावितरण कंपनीचे ३६ कोटी रुपयांचे वीजबिल थकलेले आहे. त्यामुळे अमृत अटल पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेले नवीन वीज कनेक्शन देण्यात येत नसल्याने पाणी उपलब्ध असताना देखील बीड शहराला पाणी मिळत नाही. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून विधीमंडळ अधिवेशनात, शासनाकडे, प्रशासकीय स्तरावर आणि न्यायालयात देखील हा बीडकरांचा मुलभूत प्रश्न मांडला आहे.

सुयोगाने कर्तव्यदक्ष नेते ना.अजित दादा पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आले असल्यामुळे आ.संदीप क्षीरसागर याविषयी ना.अजितदादांकडे या विषयात न्याय मागत आहेत. आ.क्षीरसागर यांनी याच विषयावर दोन आठवड्यांपूर्वी मुंबई येथे ना.अजितदादांची भेट घेतली होती. आता पुन्हा याच विषयावर आ.क्षीरसागरांनी ना.अजितदादांची रविवारी (दि.१६) रोजी जुन्नर येथे भेट घेतली. यावेळी ना.अजित दादा पवार यांनी विद्युत विभागाचे व्यवस्थापकीय संचालक यांना याविषयी तातडीने मार्ग काढण्यासाठी आदेश दिले आहेत‌. उन्हाळ्याच्या पूर्वी बीड शहराचा पाणीपुरवठा ना.अजितदादांच्या माध्यमातून सुरळीत होईल आणि गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बीडकरांच्या मुलभूत सोयीसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश येईल असा विश्वास आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

भारतरत्न नानाजींच्या विचारात सर्व प्रश्नांची उकल- डॉ. उपेंद्र कुलकर्णी

Next Post

सहावा राज्य वित्त आयोग स्थापन होणार.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

सहावा राज्य वित्त आयोग स्थापन होणार.

ताज्या बातम्या

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

सोयाबीन, तूर, मुगाची आधारभूत किंमत वाढवली…

May 28, 2025

आला रे आला ,मान्सून आला..

May 25, 2025

भारतीय संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल.

May 24, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.