• Contact Us
  • Home
Wednesday, June 17, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

भारतरत्न नानाजींच्या विचारात सर्व प्रश्नांची उकल- डॉ. उपेंद्र कुलकर्णी

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
February 14, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, शैक्षणिक
0


सावरकर महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप
बीड (प्रतिनिधी) सध्याच्या परिस्थिती मध्ये समाजात निर्माण झालेल्या विविध प्रश्नांची उकल करायची असेल तर भारतरत्न नानाजींचे विचार आचरणात आणावेत असे प्रतिपादन जन शिक्षण शोध संस्थान चे संचालक डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी केले.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयात दिनांक 13 व 14फेब्रुवारी 2025 रोजी ‘भारतरत्न नानाजी देशमुख अँन आर्किटेक ऑफ रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत मुळे, सावरकर संकुलाचे कार्यवाह डॉ. अविनाश देशपांडे,केंद्रीय कार्यकारणी सदस्य विष्णुपंत कुलकर्णी,प्राचार्य सुहास मोराळे परिषदेचे समन्वयक उपप्राचार्य डॉ. उत्तम साळवे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. उपेंद्र कुलकर्णी म्हणाले की सामाजिक पुरुषार्थ जागवण्याची प्रक्रिया नानाजींनी सुरू केली. याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. शहर आणि ग्रामीण दरी रुंदावत आहे. सर्वांगीण विकास साध्य करायचा असेल तर जनसहभाग महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर रोखणे गरजेचे आहे. सर्वसामाजिक प्रक्रियांचा अभ्यास केला पाहिजे. अध्यक्षीय समारोपात कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य म्हणाले आले की नानाजींचा विचार हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे.त्यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. दोन दिवसीय परिषदेमध्ये त्यांच्या विविध पैलूंवर मंथन झाले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिषदेचे समन्वयक डॉ. उत्तम साळवे यांनी दोन दिवसातील विविध सत्रांचा आढावा मांडला. परिषदेमध्ये सहभागी झालेले डॉ. गणेश कुलकर्णी, प्राध्यापक रोहिनी भरड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मेधा गोसावी यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी मानले. समारोप कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी प्रमोद कुलकर्णी, महेश वाघमारे, एकनाथ जाधव, डॉ संध्या कुलकर्णी, प्राचार्य प्रीती पोहेकर, प्राचार्य देवर्षी,डॉ.अपर्णा कुलकर्णी,डॉ दिगंबर तंगलवाड , विविध विद्यापीठ, महाविद्यालयातून प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते. परिषदेच्या स्मरणिके मध्ये 70 शोधनिबंधांचे प्रकाशन करण्यात आले.

Previous Post

भरतमुनींचे नाट्यशास्त्र हे भारतीय कलांचे उगमस्थान-महेश वाघमारे

Next Post

संदीप क्षीरसागरांकडून पुन्हा अजितदादांची भेट

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

संदीप क्षीरसागरांकडून पुन्हा अजितदादांची भेट

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.