• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

मनोज जारांगेचा मेहुणा तडीपार;जालना पोलिसांची कारवाई.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
February 9, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, गुन्हे
0

जालना (प्रतिनिधी) संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभर वातावरण ढवळून निघालं होतं. बीडच्या पोलीस प्रशासनावर यावरुन अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतर आता नव्यानं आलेल्या पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी गुन्हागांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.त्यानंतर आता जालन्याचे पोलीसही अॅक्शन मोडवर आले आहेत. जालन्यात कायदा व सुव्यस्था कायम राहावी या हेतून आता बीडमध्ये वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्यांना तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये मनोज जरांगे यांचे काही नीकटवर्तीय आणि नातेवाईकही असल्याचं समोर आलं आहे.

अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकूण 9 जणांना जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय. वामन मसुरराव तौर, रामदास मसुरराव तौर (दोन्ही रा. शिवनगाव ता. घनसावंगी), संदीप सुखदेव लोहकरे (रा. अंबड), गोरख बबनराव कुरणकर (रा. कुरण), अमोल केशव पंडित (रा. अंकुशनगर), गजानन गणपत सोळुंके, संयोग मधुकर सोळुंके (रा. गोंदी), विलास हरिभाऊ खेडकर (रा. गंधारी) आणि केशव माधव वायभट (रा. अंकुशनगर, ता. अंबड) अशी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या 9 आरोपींची नावं आहेत.

मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास हरिभाऊ खेडकर, सुयोग सोळुंके, गजानन सोळुंके या तिघांचाही या यादीत समावेश असून, हे मनोज जरांगे यांच्यासोबत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. या आरोपींवर अवैध वाळू उत्खनन, जाळपोळ, धमकावणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

विलास हरिभाऊ खेडकर मनोज जरांगे यांचा मेहुणा

1)2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
2)2023 मध्ये गोदावरी नदीतून 4 लाख 81 हजार रुपयांची 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणी गुन्हा.
3)2023 साली जालन्यातील शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी 307, 353 आणि 435 या कलमान्वये गुन्हा दाखल.
4)2023 रोजी पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी मधून केणी च्या साह्याने 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गोंदी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.

यामुळे विलास खेडकर याला जालना , छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यातून उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

सुयोग सोळुंकेवर कोणते गुन्हे?

1)2012-पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादीला धमकावून मारहाण तसेच पोलीस स्टेशनची तोडफोड केल्याप्रकरणी कलम 307 आणि 353 गुन्हा-
2) 2020-साली दुचाकी ची धडक देऊन मृत्युस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा.
3)2023 साली -गोदावरीतून 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल
4)2025 साली, स्वतःच्या मालकीच्या हायवा मधून वाळू चोरी केल्याचा गुन्हा.

गजानन सोळुंकेवर कोणते गुन्हे?

1) 2012 -पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याचे प्रकरण,
फिर्याद देण्यात आलेल्या साक्षीदाराला मारहाण करून पोलीस स्टेशनची तोडफोड केल्याप्रकरणी,कलम 307 आणि 353
2)2019–आरोपीकडून सहकाऱ्यांशी आपापसात मारहाण, कलम 324
3)2023 या काळात गोदावरी मधून 100 ब्रास वाळू चोरी, केल्याचा गुन्हा दाखल .
4) 2023 अवैध वाळू उत्खनन आणि चोरी प्रकरणी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल.

Previous Post

जनादेश स्वीकारणाऱ्या केजरीवालवर कुमार विश्वास भडकले..

Next Post

पंकजाताई म्हणाल्या, मी कशाला नवा पक्ष काढेल?

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

पंकजाताई म्हणाल्या, मी कशाला नवा पक्ष काढेल?

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.