• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

मागितले 15 लाख पण मिळणार 2 लाखच; करुणा मुंडेंना पोटगी

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
February 6, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

बीड (प्रतिनिधी) कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे येथील कौटुंबीक न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे यांना दोषी ठरवलं आहे. कोर्टानं धनंजय मुंडे यांना पत्नी करुणा मुंडेंना दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.या सगळ्या प्रकरणावर आता करुणा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी कोर्टाचे आभार मानले आहेत. शिवाय आपण १५ लाखांची मागणी केली होती, पण कोर्टानं दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले. या निर्णयाविरोधात आपण हायकोर्टात जाणार असल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलं आहे.

कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे म्हणाल्या, न्यायालयाचे खूप खूप आभार मानते. आज सत्याचा विजय झाला आहे. लोकांना वाटतं कोर्टात न्याय मिळत नाही. पण मला न्याय मिळाला आहे. याआधीही औरंगाबाद कोर्टात माझ्या बाजुने निकाल लागला होता. आजही माझ्या बाजुने निकाल लागला. यासाठी मी कोर्टाचे आभार मानते.”

15 लाखांची मागणी केली होती

दोन लाखांची मागणी होती की जास्तीचे पैसे मागितले होते? असा प्रश्न विचारला असता करुणा मुंडे म्हणाल्या, मी आणि माझी दोन मुलं असे तिघेजण असल्याने आम्ही प्रत्येकी पाच लाख या हिशेबाने दरमहा १५ लाखांची मागणी केली होती. मात्र कोर्टाने २ लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मी पुन्हा कोर्टात जाणार आहे, असं करुणा मुंडे यांनी म्हटलं.

करुणा मुंडे ढसाढसा रडल्या

शिवाय यावेळी करुणा मुंडे यांना अश्रू अनावर झाले. ढसाढसा रडत त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. मला जो त्रास झाला, तो शब्दात मांडता येऊ शकत नाही. बिना नवऱ्याचं जगणं अत्यंत अवघड आहे. नवरा खूप मोठ्या पदावर असताना, असं जीवन जगणं अवघड आहे. समोर मोठे मोठे वकील होते. पण माझ्या वकिलांचे मी आभार मानते, त्यांनी एक रुपयाही न घेता माझी केस लढवली. बीडचे वकील गणेश कोल्हे यांनी माझी केस लढवली. एक महिला म्हणून मोठ्या शक्तीसोबत लढणं खूप अवघड असतं. माझ्यासोबत एक केवळ वकील होता. माझ्या मागणीनुसार पैसे मिळाले नाहीत. १९९६ पासून मी माझ्या नवऱ्यासोबत आहे. मी पुन्हा हायकोर्टात जाणार आहे. धनंजय मुंडे यांचे वकील मी धनंजय मुंडेंची बायको नाही, असा युक्तीवाद करत होते. पण माझ्या वकिलांनी सिद्ध करून दाखवलं की मीच धनंजय मुंडे यांची बायको आहे आणि पहिली बायको आहे, असंही करुणा मुंडे म्हणाल्या.

Previous Post

श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन.

Next Post

घरी बसून पोलिसात तक्रार नोंदवा;पुढे पुढे करायची गरज नाही..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

घरी बसून पोलिसात तक्रार नोंदवा;पुढे पुढे करायची गरज नाही..

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.