• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

गाईंना खाटीकखाण्यात नेण्यासाठी विरोध करणाऱ्या गोरक्षक गोपाळ उनवलेला अमानुष मारहाण…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 28, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, गुन्हे
0

बीड (प्रतिनिधी):गाईंना खाटिकखाण्यात नेण्यासाठी नेहमी विरोध करतो, या कारणावरून गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे गोरक्षक गोपाळ उनवणे या 15 ते 20 समाजकंटकानी पोलिसासमक्ष बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टाळला आहे. दरम्यान उनवणे याला जिल्हा रुग्णालयात अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले. सदर घटनेचे वृत्त समजतात चकलांबा येथे बाजारचा दिवस असूनही आज मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.


चकलांबा येथील गोरक्षक गोपाल मधुकर उनवणे (वय 24 वर्षे) रा.चकलांबा या गोरक्षकाला दि. 27 जानेवारी रोजी रात्री 10 ते 15 समाजकंटकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. चकलांबा पोलीस ठाण्यातील पोलीस ठाणे हस्तक्षेप केल्यामुळे मारहाण करणारे तरुण तिथुन निघून गेले. गोपाळ उनवणे याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऊनवणे हा अखिल भारतीय गोसेवा संघात गौरक्षक म्हणुन काम करतो. दि. 27 जानेवारी 2025 रोजी रात्री 09.40 वाजण्याचे सुमारास चकलांबा गावातील पोलीस स्टेशनकडे जात असतांना चकलांबा गावातील रिहाण सय्यद, पिंटू सय्यद, अफसर चंदू शेख, असलम मेहबुब कादरी यांचसह 10 ते 15 जणांनी बस स्थानकाकडे घेऊन जाऊन विनाकारण जुन्या भांडणाचे कारण काढून शिवीगाळ करून जबर केली. रिहाण सय्यद याने खाली पडलेला दगड हातात धरुन डोक्यावर मारला. ओरडण्याचा आवाज ऐकुन लगेच पोलीस स्टेशन चकलांबा येथील पोलीस पळत आल्याने वरील लोक पोलीसांना पाहून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. जाताना धमकी की, तु जर आम्हाला परत भेटला तर तुला जीवे सोडणार नाही. उनवणे यांना डोळ्याजवळ मोठी जखम झाल्याने पोलिसांनी उपचारासाठी सरकारी दवाखाना चकलांबा येथे पाठवले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मारहाण करणाऱ्या वरील लोकांविरुध्द तक्रार दिली असून पुढील तपास चकलांबा पोलिस करत आहेत. गोरक्षकावर झालेल्या हल्ल्यामुळे चकलांबा गाव कडकडीत बंद करण्यात आले आहे.

Previous Post

बीडच्या सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी आ.क्षीरसागरांनी घेतली अजितदादांची भेट..

Next Post

कुंभमेळ्यात संगम घाटावर चेंगराचेंगरी; आजचे अमृतस्नान रद्द

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

कुंभमेळ्यात संगम घाटावर चेंगराचेंगरी; आजचे अमृतस्नान रद्द

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.