• Contact Us
  • Home
Friday, May 8, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

बनावट चलनी नोटांमध्ये मनिष क्षीरसागर यास अटक;आठवले गँगचा सहभाग निश्चित.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 21, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, गुन्हे
0

बीड (प्रतिनिधी) आठवले गॅंग सोबत सावलीसारखा राहणारा मनीष क्षिरसागर यांच्या घरामध्ये तीन महिन्यापूर्वी बनावट चलनी नोटांचा कारखाना मिळून आला होता. यामध्ये बीड शहर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत यातील प्रिंटर, बनावट चलनी नोटा, आणि सहभागी प्रमुख आरोपी तात्काळ अटक केली होते. परंतु यातील प्रमुख आरोपी मनिष क्षीरसागर हा पोलिसांना तेव्हापासून गुंगारा देत होता. परंतु बार्शी नाक्यावरील डोंगरे कुटुंबावरील खुनी हल्ल्यामध्ये पुन्हा मनीष क्षीरसागर याचा सहभाग निश्चित झाला आणि स्थानिक गुन्हे शाखेने त्याला पुणे येथून उचलले.
परंतु पुणे येथे अशा प्रकारच्या बनावट चलनी नोटांमध्ये सहभागी असलेल्या मनीष क्षीरसागर याच्यासोबत अक्षय आठवले आणि ओंकार सवाई हे सुद्धा सोबत मिळून आले होते. तेव्हाच बीड शहर पोलिसांनी बनावट चलनी नोटांच्या गुन्हे तपासा संदर्भात सावध होऊन त्या दिशेने तपास करण्यात सुरुवात केली होती. यावरून आयत्या तावडीत सापडलेल्या मनीष क्षीरसागर याचा कोर्टामार्फत बीड शहर पोलिसांनी जेलमधून ताबा घेतला. पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर मनीष क्षीरसागर याने पोलिसांना सर्व माहिती दिली. अक्षय आठवले यांनी बनावट चलनी नोटा चलनात आणण्यासाठी पुणे येथे असलेल्या प्रविण गायकवाड यास पिस्टल पुरवले होते. तसेच पळून जाताना मनीष क्षीरसागर याला सोबत घेऊन जाऊन औरंगाबाद येथे लपवले होते. तसेच सनी आठवले यांनी सुद्धा यातील आरोपींना शरण देऊन अक्षय आठवले मार्फत संरक्षण पुरवले होते. या कामी पोलिसांना गुन्ह्यात वापरलेला मनीष क्षीरसागर याचा मोबाईल मिळाला आहे. या माध्यमातून आणखी पुरावे या गॅंगच्या विरुद्ध पोलिसांना मिळणार आहे.
या संपूर्ण प्रकरणांमध्ये पोलीस अधीक्षक श्री नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंबर गोलड्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ , सहायक पोलिस निरीक्षक बाबा राठोड, पोलीस अंमलदार बाळासाहेब शिरसाट, जयसिंग वायकर, मनोज परजणे, सुषेंन पवार, सचिन अलगट, यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये येताच सर्वात मोठी घडामोड..

Next Post

पहिल्या दिवशीचे गुंतवणूक करार ६,२५,४५७ कोटींवर

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

पहिल्या दिवशीचे गुंतवणूक करार ६,२५,४५७ कोटींवर

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.