• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

ना रहेगा बास ना बजेगी बासुरी..पालकमंत्री पदच रद्द करावे -प्रा.सुरेश नवले

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 16, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, राजकारण
0

बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्रात सध्या पालकमंत्री पद हे कळीचे पद होऊन बसले आहे. कधी काळी महाराष्ट्रात पालकमंत्रीपद नव्हते, खरं तर पालकमंत्री पदाची गरजच नाही, जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे “मुख्यमंत्री” समजून काम करतात. अधिकार एकवटल्यामुळे सत्तेचे केंद्रिकरण झाले आणि त्यामधून गैरप्रकार वाढीस लागले. अवैध मार्गाने वसूलीचे उद्योग सुरू झाले, टक्केवारी बोकाळली, विविध विभागांना निधी देण्याच्या मोबदल्यात टक्केवारी वसुल केल्या जाऊ लागली, हे एखादा दुसरा जिल्हा अपवाद वगळता महाराष्ट्रात सर्रास घडत आहे. उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे मा.मुख्यमंत्री काहीच करू शकत नाहीत, कारण त्यांचे ते मंत्रिमंडळातील सहकारी आहेत.

पालकमंत्री पद नसल्यामुळे विकासाला खिळ बसते वगैरे हे धांदात असत्य आहे. पालकमंत्री हे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांना समान न्याय देत नाहीत. निधी वितरणामध्ये भेदभाव केला जातो. म्हणून समतोल विकासाला खीळ बसते. लोकनियुक्त लोकप्रतिनिधींना बाजूला ठेवून निधी वितरीत केला जातो, हेच मुळात लोकशाहीला मारक आहे. राज्यस्तरीय विभाग निहाय मंत्री समिती किंवा मंत्रीगट स्थापन करून जिल्ह्या जिल्ह्याचे नियोजन त्या त्या समिती किंवा मंत्रीगटावर टाकले तर ही एकाधिकारशाही आणि अनागोंदी कमी होऊ शकेल. मंत्रीगटामध्ये किंवा मंत्री समितीमध्ये किती मंत्री असावेत हे मा. मुख्यमंत्री यांचा अधिकार आहे. असे केले तर नक्कीच जे जागोजागी टक्केवारीचे ठेले उभे केलेले आहेत ते बंद होतील आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असे प्रा.सुरेश नवले यांनी म्हटले.

Previous Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग…

Next Post

आष्टी हादरले ; दोन भावांची निर्घृण हत्या..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

आष्टी हादरले ; दोन भावांची निर्घृण हत्या..

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.