• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

तर मुख्यमंत्र्यांवर अविश्वास दाखवल्या सारखे होईल-पंकजाताई मुंडे

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 7, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, राजकारण
0

मुंबई (प्रतिनिधी)- संतोषबदेशमुख हत्या प्रकरणात शासन कठोर भूमिका घेऊन पीडित कुटुंबाला न्याय देईल. कुणीही दोषी असेल तरी त्याला सोडणार नाही, अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात जाहीर केलेली असताना मी जर त्यावर बोलले तर मुख्यमंत्र्यांवर अविश्वास दाखविण्यासारखे होईल.तपास यंत्रणा त्यांचे काम करीत असताना मी त्यावर बोलणे उचित होणार नाही, असे स्पष्टीकरण पंकजाताई मुंडे यांनी दिले.

दोन कोटींची खंडणी आणि त्यातून झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराडला झालेल्या अटकेमुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा सर्वपक्षीयांकडून मागितला जात आहे. केवळ विरोधकच नाही तर सत्ता पक्षातल्या आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी आक्रमकपणे बाजू लावून धरलेली आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांनी पंकजाताई मुंडे यांना प्रश्न विचारले.

बीड प्रकरणावर आपली काय?

बीड प्रकरणावर आपली काय भूमिका आहे असे विचारले असता, सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात जाहीरपणे भूमिका मांडलेली असताना मी त्यावर बोलणे योग्य नाही. रोज रोज भूमिका मांडणे म्हणजे त्यांच्या दु:खाला उगाळण्यासारखे होईल. निर्घृण फक्त हत्या नसते. व्यवहारही असतो, परिवारच्या बाबतीत घटना घडल्यानंतर त्यातून आपण काहीतरी खाद्य मिळवत असू तर ते चुकीचे आहे, असे पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

संतोष देशमुख हा माझा कार्यकर्ता, मला काय वाटतंय हे कसं सांगू?

देशमुख हत्या प्रकरणात तपास यंत्रणा त्यांचे काम करतायेत. या प्रकरणात कोण कोण दोषी आहे, हे मला माहिती नाही. त्यामुळे मी कुणाचे नाव कसे घेऊ? जो कुणी असेल त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, अशी माझी वैयक्तिक मागणी आहे. संतोष देशमुखच्या लेकरांना पाहून मला काय वाटतं, हे मी तुम्हाला काय सांगू? तो माझा कार्यकर्ता होता, असे भावनिक सुरात पंकजाताईंनी सांगितले.

परळीत वंजारी समाजाचेच बहुतांशी अधिकारी कसे काय?

तसेच परळीत वंजारी समाजाचेच बहुतांशी अधिकारी कसे काय? या प्रश्नावरही पंकजाताईंनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, कोण अधिकारी कुणाचे? कोण अधिकारी कुठून आलेत? याचे मी काय उत्तर देऊ? हे अधिकारी मी आणलेत का? तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी, तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी, तेव्हाच्या यंत्रणेने हे अधिकारी आणलेत. गेली पाच वर्षे मी राज्याच्या राजकारणाच्या बाहेर होते. मी मध्य प्रदेशची प्रभारी होते. साधी आमदारही नव्हते. त्यामुळे मी यावर काय बोलू? असा बचावात्मक पवित्रा त्यांनी घेतला.

Previous Post

देवेंद्र फडणवीसांचा सात कलमी कृती कार्यक्रम…

Next Post

जिल्ह्यात 840 बिअर बार त्यात अजून 20 ची भर; अजून वाढवायचे किती ?

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

जिल्ह्यात 840 बिअर बार त्यात अजून 20 ची भर; अजून वाढवायचे किती ?

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.