• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

फरार सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 4, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील फरार असलेले आरोपी सापडल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे पकडल्याची सूत्रांकडून माहिती आहे. काही वेळात नेमकं कोणत्या आरोपींना पकडले आहे, हे होणार स्पष्ट होणार आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे. सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनाही पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे, त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणातील आरोपींना मदत करणार्‍या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतरच आरोपींचा ठावठिकाणा सापडला, अशी माहिती समोर आली आहे. अद्याप पोलिसांनी याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी दोन आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. यात सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे, प्रतिक भीमराव घुले, विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काहीजण फरार झाले होते, त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.पोलिसांनी महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले, विष्णू चाटे या चौघांना अटक केली असून ते पोलिस कोठडीत आहेत. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघे फरार होते. त्यांना पकडून देण्यात मदत करणार्‍यास पोलिसांनी बक्षीस देण्याची घोषणा देखील केली होती. कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याची माहिती आहे तर इतर दोघांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे त्यांना आज कोर्टात देखील हजर केला जाईल.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख सुदर्शन घुले आरोपी आहे आणि सुधीर सांगळे हा सहआरोपी आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी डॉक्टर संभाजी वायबसे यांनी या आरोपींना पळून जाण्यामध्ये मदत केली होती, त्याला बीड प्रथम ताब्यात घेतलं. त्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास एस आय टी, सीआयडी करत असली तरी तरीही अटक पोलिसांनी बीडच्या स्थानिक पोलीस यांनी केलेली आहे. लवकरच याबाबतची माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक देतील. यासंदर्भातली लवकरच पत्रकार परिषद होणार आहे याबाबतची माहिती अद्याप अधिकृत नसली तरी देखील गेल्या २६ दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी होते जे पळून जाण्यात यशस्वी झाले होते, त्यांना पकडण्यासाठी तीन टीम काम करत होत्या. मात्र, आज या दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आला आहे.

Previous Post

पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे पण…..

Next Post

मोबाईल वापरकर्त्यांसाठी खुशखबर; सुरू होणार फक्त कॉलिंगचा रिचार्ज..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

मोबाईल वापरकर्त्यांसाठी खुशखबर; सुरू होणार फक्त कॉलिंगचा रिचार्ज..

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.