• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

आ.सुरेश धासांनी मागितली प्राजक्ता माळीची माफी…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
December 30, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, राजकारण
0

बीड(प्रतिनिधी)
मी माफी-बिफी मागत नसतो असे ठामपणे सांगणाऱ्या आ.सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर दिलगिरी व्यक्त केली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आज सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांचं जर मन दुखावलं असेल तर प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हटलंय. त्यामुळे, माफीवरुन दोन दिवसांतच धस यांची भूमिका बदलली असून त्यांनी युटर्न घेतल्याचं पाहायला मिळालं.प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषय नव्हता. मी प्राजक्ताताई सह सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने, त्यांचे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे सुरेश धस यांनी म्हटलं. दरम्यान, मला भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांचा फोन आला नाही, किंवा कुणी माफीसाठी दबाव टाकला नाही. केवळ चंद्रकांत पाटील यांच्यासोबत माझं बोलणं झालं, असेही धस यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील यांचा फोन

माझ्याशी कोणीही संपर्क केला नाही, मला फक्त चंद्रकांत दादांचा फोन आला होता. चुकलो किंवा नाही चुकलो तरीही तू क्षमा मागून टाक असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे, एक मिनिटांत माफी मागतो असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली असल्याचंही सुरेश धस यांनी म्हटलं. माझ्याकडून चुकलेलं काही नाही, तरीही मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा फोकस हा संतोष देशमुख यांचा झालेला खून, त्याची पुढील प्रक्रिया यावर आहे. माझ्या हातानेच मी ती लिहिलेलं आहे, एखादा शब्द इकडं-तिकडं होऊ नये म्हणून मी स्वत:च ते लिहून वाचलं आहे. मी ग्रॅज्यूएट आहे, असेही सुरेश धस यांनी म्हटले.

Previous Post

दत्तधाम मधील श्रीदत्त मूर्तीची हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा…

Next Post

देवेंद्र फडणवीस-जयदत्त क्षीरसागर भेटीमुळे बीड जिल्ह्यात चर्चेला उधाण…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

देवेंद्र फडणवीस-जयदत्त क्षीरसागर भेटीमुळे बीड जिल्ह्यात चर्चेला उधाण…

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.