• Contact Us
  • Home
Saturday, June 7, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

परळीला महिला कलाकारच येतात का? प्राजक्ता माळीचा संतप्त सवाल…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
December 28, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, राजकारण
0

मुंबई (प्रतिनिधी) आज अभिनेत्री, लेखिका प्राजक्ता माळी यांच्याकडून मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी,पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळीचं कंठ दाटून आल्याचं पाहायला मिळालं. तसेच, माझ्या भावाने सोशल मीडिया बंद केला, आई रात्रभर झोपली नाही, आमच्या कुटुंबाला मोठा त्रास होत असल्याचे सांगत गेल्या दीड महिन्यांपासून मी हे सर्व सहन करत होते. मात्र, एका लोकप्रतिनिधीने माझं नाव घेतल्यामुळे मी आज समोर येऊन बोलत आहे, असे प्राजक्ता माळीने म्हटले. तसेच, आमदार सुरेश धस यांनी जाहीरपणे माफी मागावी, असेही तिने म्हटले.

गेल्या दीड महिन्यांपासून हे सुरू आहे. माझ्यावर टीका होतेय पण मी शांत आहे. पण, मी शांत बसते म्हणजे माझी मूकसंमती नाही, असे म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषदेत बोलायला सुरुवात केली. आमदार सुरेस धस यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी मी आज पत्रकार परिषद घेत आहे, असेही प्राजक्ता हिने म्हटले. माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे. तुम्ही राजकारणी आहात, आम्ही कलाकार आहोत. तुम्ही तुमचं राजकारण करा, पण आम्हाला कलाकारांना का मध्ये घेता. परळीला केवळ महिला कलाकारच येतात का, पुरुष कलाकार कधी गेल्याच नाहीत का परळीला. महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शोभत नाही, तुम्ही महिला कलाकारांच्या चारित्र्यावर संशय घेत नाहीत, तर त्यांच्या कर्तृत्वावर देखील तुम्ही प्रश्न उपस्थित करते, असे म्हणत प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार पलटवार केला. तसेच, मी महिला आयोगाकडे याबाबत तक्रार केली असून कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केल्याचही प्राजक्त माळीने म्हटले.

प्राजक्ता माळीकडून खंत व्यक्त

हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठल्या कुठे आमच्यावर बेतलेलं आहे. आपल्या कुठल्यातरी रागाच्या भरात कोणी काहीतरी बरळून जाते. त्यानंतर त्या दोन वाक्यांचे मीडिया हजार व्हिडिओ करते, तेवढेच शब्द पकडते आणि यूट्यूब चॅनेलवर हजार व्हिडिओज बनतात. मग एका सेलिब्रिटीला त्याच्यावर व्यक्त करण्यास भाग पाडलं जातं. मग ती बोलते, मग परत पहिल्या व्यक्तीला वाटतं आता आपण बोललंच पाहिजे आणि हे चालू राहते. महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचे मनोरंजन होतं राहते, अशा शब्दात प्राजक्त माळीने खंत व्यक्त केली.

मुख्यमंत्री कारवाई करणार..

महिला आयोगाकडे तक्रार देखील केल्याचे प्राजक्ताने सांगितले. तसेच आज सकाळीच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांची वेळ घेण्यासाठी फोन केला होता. फोनवर आमचे बोलने देखील झाले. त्यांनी देखील मला हेच सांगितले की, अशा प्रकारचे नॉनसेन्स मी कधीच मान्य करणार नाही. मी तुम्हाला पत्रकार परिषद घेण्यापासून रोखणार नाही. तुम्ही जा आणि पत्रकार परिषद घ्या. याबाबत मी आधीच सुरेश धस यांच्याशी बोललो आहे. अशा प्रकारचा मूर्खपणा आम्ही कोणीच मान्य करून घेणार नाही. मी प्रत्यक्षात भेटून त्यांच्याशी याबद्दल बोलणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे प्राजक्ता म्हणाली.

अशा प्रकरणात एखादी व्यक्ती माफी मागते आणि पुढे जाते. पण अशा प्रकारची घटना या पुढे कधीच होऊ नये यासाठी कारवाई झाली पाहिजे असे तिने सांगितले.

Previous Post

महाराष्ट्र संघात साक्षी शिंदे व अनुश्री स्वामी यांची निवड..

Next Post

शस्त्र परवाने रद्द का करू नयेत? बीडमध्ये २६० जणांना नोटीस

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

शस्त्र परवाने रद्द का करू नयेत? बीडमध्ये २६० जणांना नोटीस

ताज्या बातम्या

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

सोयाबीन, तूर, मुगाची आधारभूत किंमत वाढवली…

May 28, 2025

आला रे आला ,मान्सून आला..

May 25, 2025

भारतीय संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल.

May 24, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.