• Contact Us
  • Home
Wednesday, June 17, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

प्रा.राम शिंदे विधानपरिषदेचे बिनविरोध सभापती…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
December 20, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, राजकारण, राज्य
0
प्रा.राम शिंदे विधानपरिषदेचे बिनविरोध सभापती…

नागपूर (प्रतिनिधी) विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचे आमदार राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाजपकडून राम शिंदे यांनी बुधवारी सकाळी विधान परिषद सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. राम शिंदे यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानुसार राम शिंदे यांच्या निवडीची घोषणा आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात केली. त्यानंतर राम शिंदे हे त्यांच्या आसनाकडे जात असताना निलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानामुळे विधानपरिषदेमध्ये हास्यकल्लोळ उडाला

विधान परिषदेच्या सभापतीपदी प्रा.राम शंकर शिंदे यांची गुरुवारी आवाजी मतदानाने एकमताने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रा. राम शिंदे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी राम शिंदे यांनी सभापती पदावर सभागृहाने एकमताने निवड केल्यबद्दल विरोधी पक्षाचा सदस्यांसह सर्व सदस्यांचे आभार मानले. मात्र उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमटले.

प्राध्यापक राम शिंदे यांनी सभापतीचे आसन स्विकारावे अशी विनंती निलम गोऱ्हे यांनी केली. “त्यांना पुढच्या बाजून येण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे त्यांना मागच्या दाराने आणावं लागणार आहे. त्याच्यावर मी काही वेगळं भाष्य करणार नाही. शंभुराजे देसाई यांची इच्छा होती की त्यांना थेट पुढून आणावं. मात्र त्यासाठी आसन कापावं लागलं असतं. ते बरोबर झालं नसतं, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या. त्यानंतर सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

यानंतर सभापती राम शिंदे यांना त्यांच्या आसनापर्यंत नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर सभापती राम शिंदे हे मागच्या बाजूने येऊन आसनस्थ झाले. यावेळी त्यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले.

Previous Post

हिवाळी अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींचे पैसे देणार-फडणवीस…

Next Post

सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शनमोडमध्ये; खंडणी प्रकरणात वाल्मिकी कराड यांच्यावर देखील मोठी कारवाई केली जाणार

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शनमोडमध्ये; खंडणी प्रकरणात वाल्मिकी कराड यांच्यावर देखील मोठी कारवाई केली जाणार

सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शनमोडमध्ये; खंडणी प्रकरणात वाल्मिकी कराड यांच्यावर देखील मोठी कारवाई केली जाणार

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.