• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

शंभर शकुनी मेल्यावर हे एक जन्माला आलेत…..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
December 10, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

शंभर शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आलेत अशी घणाघाती टीका मारकडवाडीत आ.गोपीचंद पडळकर यांनी केलीय,धनगरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पवार माझ्या समाजाची बदनामी करत असल्याचेही त्यांनी म्हंटल आहे.

मारकडवाडीतील लोकांना बॅलेट पेपरवर मतदान हवा आहे, असं त्यातून सांगितल्या जातंय. मात्र खरंच इथल्या लोकांना बॅलेट पेपरवर मतदान हवं आहे का? माविआला कोणी मतदान केलंय का? हे सर्वांना कळलं पाहिजे, म्हणून आम्ही मारकडवाडीत आलो आहे. मात्र हे मारकडवाडी पार्टन सर्वप्रथम कुणाल दिसलं. हे गाव माझ्या पै-पाहुण्यांचं गाव आहे. 90 टक्के येथे धनगर समाज राहतो. म्हणून माझी जबाबदारी वाढली आणि लक्षात आलं की इथे धनगरांनाच पुढे का करण्यात आलं? म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या प्रक्रियेतून जी निवडणूक पार पडते त्याच्या विरोधात आहे, असं वातावरण निर्माण करण्याचं महापाप शरद पवार यांनी केला आहे. म्हणुन आज आम्ही मारकडवाडी मध्ये आलो आहे.

100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले आहेत. यांचे डोकं बघा, धनगर समाज लोकशाही मनात नाही, असे भासवण्यात आलंय. या विधानसभेत 100 गाव असताना नेमकं माझ्याच मारकडवाडीला कां पुढे करण्यात आलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आज सदाभाऊ खोत आणि मी या तुमच्या गावात आलो असल्याचे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे.

आधी आपल्या लेकीचा, नातवाचा राजीनामा घ्या..

पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, जे संसद भवन, राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये डौलाने उभे आहे त्याच्या निर्मितीत धनगर समाजाचे योगदान आहे. ज्या जमिनी आहे त्या होळकरांच्या रायसोनी गावातल्या आहेत. लोकशाही मजबूत करण्यासाठी होळकरांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणुन शरद पवारांचा डाव उधळून टाकण्यासाठी मी आज या गावात आलो आहे. असे असेल तर शरद पवारांनी आपल्या लेकीचा, आपल्या नातवाचा पहिले राजीनामा घेतला पाहिजे. जयंत पाटील येथे येऊन गेले त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या तिघांचा पहिल्यांदा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यानंतर हे आंदोलन पुढे नेले पाहिजे. असेही गोपीचंद पडळकर म्हणाले. तसेच राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण प्रियंका गांधी यांनीही राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. तुम्ही केवळ बळीचे बकरे आम्हालाच करत आहात. म्हणून राज्यातील प्रस्थापितांना आपल्याला उधळून लावावे लागेल असेही ते म्हणले.

Previous Post

आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली विधानसभेत शपथ

Next Post

संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिसरा आरोपी पुण्यात जेरबंद..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिसरा आरोपी पुण्यात जेरबंद..

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.