• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

देवेंद्र फडणवीस पुन्हा जिंकले……

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
December 9, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

मुंबई (प्रतिनिधी)
‘विश्वासदर्शक ठराव बहुमतानं मंजूर झाला आहे. राज्यपालांच्या भाषणानंतर विधानसभेचे कामकाज आता तहकूब होणार असून ते पुन्हा सुरू होईल, असं नार्वेकर यांनी विधानसभेत सांगितलं. २८८ सदस्यांच्या विधानसभेत महायुतीकडे २३० आमदारांचे प्रचंड बहुमत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंधराव्या विधानसभेचा कार्यकाळ ७ डिसेंबरपासून अधिकृतपणे सुरू झाला. २८८ सदस्यांच्या कनिष्ठ सभागृहात भाजपप्रणित आघाडीला २३० जागा मिळाल्यानं बहुमत चाचणी ही केवळ औपचारिकता होती.

कोणाकडं किती आमदार?

नार्वेकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानं महायुतीकडे आता छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांसह २२९ आमदारांचा पाठिंबा आहे. महाराष्ट्र विधानसभेतील सत्ताधारी महायुतीमधील भाजपकडं १३२, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडं ५७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडं ४१ आमदार आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाकडं दोन, राष्ट्रीय समाज पक्ष, राजर्षी शाहू विकास आघाडीकडं प्रत्येकी एक जागा आहे, तर दोन अपक्षांचा सरकारला पाठिंबा आहे.

विरोधी महाविकास आघाडीतील काँग्रेसकडं १६, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडं २० आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं १० जागा आहेत. समाजवादी पक्षानं दोन जागा जिंकल्या आहेत. पीडब्ल्यूपीला १, एमआयएमला १ तर सीपीएमला एक १ मिळाली आहे. यापैकी समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास करत आहे, अशा पद्धतीनं हा ठराव मांडण्यात आला होता. आवाजी मताने हा ठरवा मंजुर करण्यात आला आहे. या विधानसभा निवडणुकीत मुहायुतीला मोठं यश मिळालं आहे. 288 पैकी 232 जागा महायुतीच्या निनवडून आल्या आहेत. त्यामुलं पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. यामध्ये 132 जागा या एकट्या भाजपला मिळाल्या आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, महायुतीकडे मोठ्या प्रमाणात आमदारांची संख्या असल्यामुळं सरकारचा विश्वासदर्शर ठराव आवाजी मताने मंजूर झाला आहे.

विधानसभेच्या अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवशी राहिलेल्या 8 आमदारांनी शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज एकमताने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मात्र, विधानसभेत अध्यक्षांची निवड होत असताना शिवसेना ठाकरे गटाचा एकही आमदार सभागृहात उपस्थित राहिला नाही, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला होता. यावर मुख्यमंत्र्यासंह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंद केले. त्याचबरोबर जयंत पाटील, नाना पटोले, नितीन राऊत, विश्वजीत कदम रोहित पाटील यांनी देखील विधानसभा अध्यक्षांचे अभिनंदन केले

Previous Post

द्वेषाचे चक्रव्युह भेदुन अखेर देवेंद्र पुन्हा आले..!

Next Post

आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली विधानसभेत शपथ

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली विधानसभेत शपथ

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.