• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

तर त्या आमदारांना सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
December 7, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 288 आमदारांच्या शपथविधीसाठी शनिवारपासून सुरु झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शपथविधीवरच बहिष्कार टाकत सभात्याग केला , उद्याही जर विरोधी आमदारांनी शपथ घेतली नाही तर त्यांना परवा सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेता येणार नाही.त्यामुळे पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येताना दिसले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या कृतीची खिल्ली उडवत हा रडीचा डाव असल्याचे म्हटले. ते शनिवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मी महाविकास आघाडीत काम केले आहे, मी त्यांचा कार्यकर्ता होतो. विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी ईव्हीएम मशिनला दोष देण्यात अर्थ नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांना 31 जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं. पण विधानसभेला पराभव होताच त्यांनी ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. लोकशाहीत प्रत्येकाला काय बोलायचं हा अधिकार आहे. पण विरोधकांना शपथ घेण्यासाठी उद्याचाच दिवस आहे. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना शपथ घ्यावीच लागेल. ती एक प्रोसिजर आहे. तरच त्यांना परवा सभागृहातील कामकाजात सहभागी होता येईल, असे अजित पवार यांनी म्हटले.

विरोधकांनी पहिल्या दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय, असे दाखवायचे आहे. आम्ही संख्येने कमी असलो तरी अस्तित्व दाखवण्याचा हा केविलवाणा प्रकार आहे. या सगळ्याला अर्थ नाही. सुरुवातीला विरोधाक आत बसले होते. आठ-दहा लोकांची शपथ झाल्यावर ते सभागृहातून बाहेर जायला निघाले. त्यावेळी मी त्यांना विचारले, कुठे चाललात? त्यावर विरोधक म्हणाले, असंच बाहेर जात आहोत. मी बाहेर आल्यावर कळालं की विरोधकांनी आज शपथ घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार हे भाजपसोबत गेल्याने आयकर विभागाने जप्त केलेली त्यांची 1000 कोटी रुपयांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवण्यात आली, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार हसले. त्यांनी म्हटले की, मी इतकी वर्षे त्यांच्यासोबत होतो. मी भ्रष्टाचारी आणि दोषी असतो तर मविआने माझ्यासोबत काम केले नसते. कोर्टाचा निकाल एका दिवसात येत नाही. यासंदर्भात प्रोसेस सुरु होती. मला जिथे न्याय मिळेल असं वाटत होते, तिकडे मी गेलो आणि न्याय मागितला. विरोधकांसाठी मी त्यांच्यासोबत असला की चांगला असतो. राजकीयदृष्ट्या मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

Previous Post

जनतेच्या विश्वासु नेतृत्वाला उभारी देण्याची गरज..

Next Post

आई ,तू हे करू शकतेस,वियानाचा आईला धीर…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

आई ,तू हे करू शकतेस,वियानाचा आईला धीर…

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.