• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

भारताचा दणदणीत विजय

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये सुरु असलेली टेस्ट टीम इंडियानं 7 विकेट्सनं जिंकली

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 1, 2024
in ताज्या बातम्या
0
भारताचा दणदणीत विजय

मुंबई: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये सुरु असलेली टेस्ट टीम इंडियानं 7 विकेट्सनं जिंकली आहे. कानपूर टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसामुळे पूर्ण खेल होऊ शकला नव्हता. त्यानंतर दुसरा संपूर्ण दिवस पावसामुळे वाया गेला. तिसऱ्या दिवशीही मैदान ओलं असल्यामुळे खेळ होऊ शकला नाही. त्यावेळी ही टेस्ट ड्रॉ होईल असाच सर्वांचा अंदाज होता. पण, भारतीय टीमनं सकारात्मक खेळ करत हा विजय खेचून आणला. या विजयासोबतच भारतानं दोन टेस्टची ही सीरिज 2-0 अशा फरकानं जिंकली. या विजयाबरोबरच वर्ल्ड टेस्ट सीरिज चॅम्पियनशिप फायनलच्या दिशेनं टीम इंडियानं मजबूत पाऊल टाकलं आहे.

पाचव्या दिवशी जडेजा-बुमराहची कमाल
टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विननं चौथ्या दिवशी दोन विकेट्स घेत बांगलादेशला बॅकफुटवर ढकललं होतं. पाचव्या दिवशी सकाळी अश्विननं मोमिनुल हकला आऊट करत भारताला महत्त्वाचं यश मिळवून दिलं. हकनं पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी करणारा हक दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 2 रन काढून आऊट झाला.

अश्विननंतर रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह या अनुभवी बॉलर्सनी नियमित अंतरानं विकेट्स घेत बांगलादेशला मॅच वाचवण्याची संधी दिली नाही. जडेजा आणि बुमराह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. बांगलादेशची दुसरी इनिंग 146 रनवर संपुष्टात आली.

बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ अशोक थोरात यांची वर्णी

भारतीय क्रिकेट टीमसमोर विजयासाठी 95 रनचं टार्गेट होतं. भारतानं हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताकडून दुसऱ्या इनिंगमध्ये यशस्वी जैस्वालनं सर्वाधिक 51 रन केले. बांगलादेशच्या क्रिकेट टीमनं भारतामध्ये येण्यापूर्वी पाकिस्तानविरुद्धची टेस्ट सीरिज 2-0 या फरकानं जिंकली होती. त्यानंतर भारताविरुद्धही तसाच खेळ करण्याची गर्जना बांगलादेशचा कॅप्टन नजमुल हसन शांतोनं केली होती. पण, दोन्ही टेस्ट सहज जिंकत टीम इंडियानं बांगलादेशला त्यांची जागा दाखवून दिली आहे.

Tags: criket
Previous Post

बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ अशोक थोरात यांची वर्णी

Next Post

‘इराणने मोठी चूक केली,त्यांना किंमत मोजावी लागेल’

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
‘इराणने मोठी चूक केली,त्यांना किंमत मोजावी लागेल’

‘इराणने मोठी चूक केली,त्यांना किंमत मोजावी लागेल’

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.