• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

दिल्लीत हालचाली; फडणवीसांचे नाव आघाडीवर…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 25, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

मुंबई ( प्रतिनिधी ) राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर आता सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल होणार आहे.यावेळी दिल्लीत सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यात आता देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यात सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, अशी कार्यकर्त्यांची देखील भावना आहे. यासह अनेक आमदारांनी देखील फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. त्यामुळे आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केला जाईल असेही सांगण्यात येत आहे.

महायुतीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नव्या सरकारमध्ये असणार आहे. नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळात भाजपचे सर्वाधिक मंत्री असणार असून अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाला समसमान मंत्रीपद देण्यात येईल अशीही माहिती समोर येत आहे.

महायुतीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नव्या सरकारमध्ये असणार आहे. यातच राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, संभाजीपाटील निलंगेकर, गणेश नाईक, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, राणा जगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, यांची नावे समोर आली आहे.

शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी देखील समोर आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोडभरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे यांचा समावेश आहे.

अजित पवार गटातील संभाव्य मंत्र्यांचीही यादी आली असून यात अजिते पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्रम. अदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे.

Previous Post

हिंदूंवर बहिष्कार वक्तव्यावर नोमानींनी मागितली माफी…..

Next Post

भारताचा कांगारुवर विजय…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

भारताचा कांगारुवर विजय…

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.