• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

हिंदूंवर बहिष्कार वक्तव्यावर नोमानींनी मागितली माफी…..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 25, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी व्होट जिहादचा मुद्दाही चांगलाच चर्चेत राहिला. प्रचारादरम्यान याला हवा मिळाली ती मौलाना सज्जाद नोमानी यांच्या एका व्हिडीओमुळे, व्हिडीओवरून भाजपने महाविकास आघाडीला लक्ष्य केले. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नोमानी यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल खुलासा करीत माफीही मागितली आहे.

ऑल इंडिया एकता फोरमचे अध्यक्ष, इस्लामचे प्रचार मौलाना सज्जाद नोमानी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भूमिका स्पष्ट केली. भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याच्या विधानाबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. माझे विधान कोणत्याही समाजाच्या विरोधात नव्हते वा कोणत्याही प्रकारचा फतवा नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे.

मी बिनशर्त माफी मागतो.

खलीलूर रहमान सज्जाद नोमानी नदवी यांचे एक पत्र समोर आले आहे. त्या पत्रात त्यांनी चर्चेत असलेल्या विधानाबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.

“भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याबद्दल जे माझे विधान सध्या चर्चेत आहे; एका विशेष संदर्भाने अनेक लोकांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले गेले होते. हे ते लोक होते, ज्यांना लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या मुलभूत अधिकारापासून रोखले गेले होते. माझी प्रतिक्रिया त्या लोकांसाठी होती, जे भारताच्या सर्वसामान्य नागरिकांना संविधानिक अधिकारापासून रोखत होते”, असे सज्जाद नोमानी यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणतात, “त्यामुळे त्या संदर्भाशिवाय माझ्या वक्तव्याकडे बघणे चुकीचे होईल. माझे विधान महाराष्ट्र निवडणूक २०२४ च्या खूप आधी सप्टेंबर २०२४ मधील आहे. माझे विधान कोणत्याही समाजाविरोधात अजिबात नव्हते. माझा तसा कोणताही उद्देश नव्हता, ना कोणत्याही प्रकारचा फतवा होता”, असा खुलासा सज्जाद नोमानी यांनी केला आहे

सज्जाद नोमानी यांनी शब्द मागे घेत माफीही मागितली आहे. ते पत्रात म्हणाले, “तरीही जर माझ्या या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द मागे घेतो आणि बिनशर्त माफी मागतो. मी नेहमी सत्य आणि न्यायासाठी संघर्ष करत आलोय आणि मी नेहमी त्या व्यक्तीला विरोध केला आहे, ज्याने सर्वसामान्य माणसांना त्रास दिला आहे. मग तो मुसलमान असो वा अन्य कुणी”, अशी भूमिका सज्जाद नोमानी यांनी मांडली आहे.

सज्जाद नोमानी यांचे विधान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रचंड वादग्रस्त ठरले होते. भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाका. भाजपला मतदान करू नका. महाविकास आघाडीला साथ द्या, असे ते म्हणाले होते.

Previous Post

ऋषभ पंतची 27 कोटीत विक्री ;आजपर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू……

Next Post

दिल्लीत हालचाली; फडणवीसांचे नाव आघाडीवर…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

दिल्लीत हालचाली; फडणवीसांचे नाव आघाडीवर...

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.