• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

पी बी ए बी च्या सर्व्हेत देखील भाजपाच सर्वात मोठा पक्ष

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 22, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

राज्यातील सर्वच जनतेचे विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. त्यानंतर दुपारपर्यंत राज्यात नेमके कोणाचे सरकार येणार?

हे स्पष्ट होईल. त्याआधी वेगवेगळ्या संस्थांनी आपल्या एक्झिट पोलच्या अंदाजात नेमके कोणाचे सरकार येणार? याचे अंदाज व्यक्त केले आहेत. असे असतानाच आता आणखी एका संस्थेने एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात कोणाचे सरकार येणार, याचा अंदाज व्यक्त केला आहे.

भाजपा सर्वांत मोठा पक्ष..

पॉलिटिकल ब्युरे अँड अॅनालिसिस ब्युरो या संस्थेने मतदानानंतर लोकांच्या मनात नेमकं काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेने राज्यात कोणाला किती जागा मिळणार? याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार राज्यात भाजपाला 99 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना पक्षाला 33 जागा मिळू शकतात. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 19 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच महायुतीला एकूण 151 जागा मिळण्याची शक्यता आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा ..

दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस या पक्षाला 36 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला 38 जागा मिळू शकतात. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 47 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच महाविकास आघाडीला एकूण 121 जागा मिळण्याची शक्यता आहे.

अपक्ष आमदारांचीही भूमिका महत्त्वाची…

प्राब या संस्थेच्या अंदाजानुसार या निवडणुकीत एकूण सहा अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतात. समाजवादी पार्टीचाही दोन जागांवर विजय होण्याची शक्यता आहे. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचा दोन तर एमआयएम पक्षाचा एका जागेवर विजय होऊ शकतो. जनसुराज्य, भाकप, मनसे, रासप, सेकाप या पक्षांनाही प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोलचा निकाल हा फक्त अंदाज आहे. 23 तारखेला मतमोजणीनंतर राज्यात कोण सरकार स्थापन करणार हे समजणार आहे. त्यापूर्वी मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. बैठकांचे सत्र चालू झाले आहे.

:

Previous Post

अॅक्सिसच्या महायुतीत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू….

Next Post

भारतीय आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज ढेपाळले;बुमराहची कमाल…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

भारतीय आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज ढेपाळले;बुमराहची कमाल…

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.