• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

ज्ञानराधाच्या पंटरवर सपत्नीक गुन्हा;ठेवीदारांचा तळतळाट भोवला…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 22, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0
ज्ञानराधाच्या पंटरवर सपत्नीक गुन्हा;ठेवीदारांचा तळतळाट भोवला…

बीड (प्रतिनिधी) ज्ञानराधा पतसंस्थेचा पंटर म्हणून काम करून लाखो ठेवीदारांचा तळतळाट घेणारा आणि इंदापूर येथे राहणार्‍या एका पोलीस निरीक्षकाने एका वर्षात तब्बल २ कोटी ७ लाख ३१ हजार रुपये कमाविल्याचा धक्कादायक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे.त्याच्यावर अपसंपदा बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हरिभाऊ नारायण खाडे (तत्कालीन पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, बीड, रा. विकासवाडी, पो. रेडणी ता. इंदापूर, जि. पुणे) आणि त्याची पत्नी मनीषा हरिभाऊ खाडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांची बीडमध्ये आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध १६ मे २०२४ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई केली होती. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते.

उघड चौकशी दरम्यान परीक्षण कालावधीमध्ये म्हणजे १० ऑगस्ट २०२३ ते १६ मे २०२४) या दरम्यान हरिभाऊ खाडे याने त्याचे सेवा कालावधीतील परिक्षण काळात सर्व ज्ञात व कायदेशीर मार्गाने मिळणार्‍या उत्पन्नापेक्षा २ कोटी ७ लाख ३१ हजार ३५८ रुपये (११६.२८ टक्के) रक्कमेची अपसंपदा संपादित केली आहे. त्यापैकी त्याची पत्नी मनिषा खाडे हिने सुमारे ६२ लाख ७९ हजार ९५३ रुपयांची मालमत्ता स्वत:च्या नावावर धारण करुन हरिभाऊ खाडे याला अपसंपदा संपादित करण्यासाठी सहाय्य केल्याचे उघड चौकशीत निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी ही कारवाई केली आहे़ पोलीस निरीक्षक किरण बगाटे अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

स्वनिल गलधर शिवसेनेच्या बीड जिल्हाप्रमुखपदी नियुक्त…

Next Post

अॅक्सिसच्या महायुतीत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

अॅक्सिसच्या महायुतीत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू….

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.