• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

काही तुरळक प्रकार वगळता बीड जिल्ह्यात शांततेत मतदान….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 21, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0
काही तुरळक प्रकार वगळता बीड जिल्ह्यात शांततेत मतदान….

बीड: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परळी मतदार संघातील घाटनांदूर येथे मतदान केंद्रावर तोडफोडीची घटना घडली होती. यावेळी मतदान केंद्रावर असलेल्या ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनची तोडफोडप्रकरणी जवळपास 40 जणांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

महाविकास आघाडीचे नेते ऍड. माधव जाधव यांना कन्हेरवाडी येथे मारहाण करण्यात आली. व्हिडीओ व्हायरल होताच या मारहाणीचे पडसाद संपूर्ण मतदार संघात उमटले. यावेळी मतदान केंद्राची तोडफोड आणि कर्मचाऱ्याला सुद्धा मारहाण झाल्याची तक्रार देण्यात आली आहे, चाळीस जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत यापैकी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घाटनांदुर आज बंद

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद घाटनांदुर या ठिकाणी म्हटले आणि घटना येथील मतदान केंद्र मध्ये तोडफोड होऊन झाली या प्रकरणी 40 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि याच घटनेच्या निषेधार्थ आज घाटनांदुर बंद ठेवण्यात आलेले आहे सकाळपासून गावातील दुकाने उघडलेली नाहीत. कालच्या घटनेनंतर पोलिसांनी दाखल केलेल्या तरुणावरील गुन्ह्याच्या निषेधार्थ आज घाटनांदूर बंद आहे.

मतदारसंघात दहशत निर्माण
केल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप-

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आणि मुलाने मतदारसंघात दहशत निर्माण केल्याचा आरोप अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी केला . परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये कधी नव्हे ते गालबोट या निवडणुकीला लागले असून या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब देशमुख यांच्याकडून दहशत पसरवण्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला . घाटनांदुर ,मुरंबी तसेच चोथेवाडी या ठिकाणी मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बन्सी शिरसाट यांनाही मारहाण केली असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला . ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा धनंजय मुंडे यांनी केली आहे.

परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे करत आहेत. याचदरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना बाहेर उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते ऍडव्होकेट माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

आष्टी विधानसभा मतदारसंघातही हाणामारी.

बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघात काल सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली,आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी गाव भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार महबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली मात्र हे संपूर्ण प्रकरण हाणामारीपर्यंत गेले.

Previous Post

मराठा मतदारांची पसंती स्थानिक मराठा उमेदवाराला मिळाल्याचा एक्झिट पोलचा अंदाज…

Next Post

विराटची मोठी घोषणा; चाहते हवालदिल…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

विराटची मोठी घोषणा; चाहते हवालदिल…

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.