• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

संदीप क्षीरसागर तरुणांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार…..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 15, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

बीड(प्रतिनिधी) विधानसभा निवडणूकीची प्रचार अंतिम टप्प्याकडे सरकत असताना बीड मतदार संघात आ.संदीप क्षीरसागर यांची ताकद आणखी मजबूत झाली आहे. शुक्रवारी (दि.१५) दुपारी बीड मतदारसंघातील मैंदा व बेलुरा येथील युवकांनी मोठ्या संख्येने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेवर चालण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला.या सर्वांचे बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि महाविकास आघाडीचे बीड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आ.संदीप क्षीरसागर यांनी स्वागत केले. तसेच आपल्या सर्व युवक, तरुण मित्रांच्या खांद्याला खांद्या लावून मतदारसंघात काम करेल असा शब्द आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी दिला.

मैंदा व बेलुरा येथील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याशी आ.संदीप क्षीरसागर यांनी संवाद साधला. जेव्हा सर्वसामान्य नागरिक आणि युवक एकजुटीने उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहतो, तेव्हा त्या उमेदवाराचा विजय नक्कीच होतो. युवकांनी आणि नागरिकांनी माझी निवडणूक हातात घेतली आहे. विरोधकांच्या भूलथापांना व अमिषेला बळी न पडता मोठ्या संख्येने दररोज अनेकांचे जाहीर पक्षप्रवेश होत आहेत. आपल्या सर्वांच्या साक्षीने मी बीड मतदारसंघाच्या विकासासाठी आगामी काळात काम करेल असा शब्द आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी दिला. येथे वीस तारखेला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

यावेळी उत्तरेश्‍वर घुमरे (मा.उपसरपंच), पंजाबराव घुमरे (मा.सरपंच),गोरख घुमरे, अमोल मौंदेकर, अशोक कसबे, महारुद्र घुमरे, गणेश दुकानदार, गणु दादा, पोपट कसबे, परमेश्‍वर नाना घुमरे, लाला घुमरे, गंगाधर बाप्पा घुमरे, प्रदीप कसबे, नंदू राठोड, सतीश भोर, चंदू सगळे, दत्ता पाटील,नितीन घोटे,बळी कसबे, बाप्पा घुमरे, अमोल उपडे, एस.पी.घुमरे, दत्ता मोमीन मेंबर, अभिषेक घुमरे, महेश गडसिंग, दत्ता पाटील घुमरे, कैलास लांडे तसेच पांडुरंग गवते युवा सेना जिल्हाप्रमुख बीड, रामेश्‍वर गवते, बालाजी गवते, ज्ञानेश्‍वर लाटे, संपत ढवळे, कुमार भाऊ गवते, रावसाहेब जिजा गवते, गोपाल गवते, नंदू गवते, दत्ता गवते, बाळू गवते, मच्छिंद्र लाटे, सचिन गवते, विशाल गवते, भाऊसाहेब गवते, महादेव गवते, भारत गवते, गोरख गवते, तुकाराम गवते, पप्पू गवते, बजरंग गवते, अशोक लाटे, दादासाहेब गवते, अजय गवते, ज्ञानेश्वर ढवळे व इतर मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला.

Previous Post

घरपोच सेवा ही आमची कामाची पद्धत ; जयदत्त क्षीरसागर प्रत्यक्ष प्रचारात उतरले….

Next Post

व्यापाऱ्यांना भेसळखोर म्हणणाऱ्या महाआघाडीला धडा शिकवा-उदय सामंत..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

व्यापाऱ्यांना भेसळखोर म्हणणाऱ्या महाआघाडीला धडा शिकवा-उदय सामंत..

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.