• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

अजित पवारांच्या बॅगचीही तपासणी,पण सापडले भलतेच….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 13, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असून राज्यातील प्रमुख नेते विविध जिल्ह्यात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. यादरम्यान राजकीय नेत्यांसोबत असणाऱ्या बॅगेची तपासणी देखील केली जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली.मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंसारखे आकांडतांडव न करता हसतखेळत तपासणी कर्मचाऱ्यांना सहकार्य केले.

बारामतीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या हॅलिकॉफ्टरची तापासणी केली. अजित पवारांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या. अजित पवारांनी फोनवर बोलत असातान स्वतः बॅगा तपासण्यासाठी दिल्या. यावेळी एका बॅगेत चकल्या होत्या. बॅगेतल्या चकल्या हातात घेऊन खा-खा बाबा…सगळ्या बॅगा तपास…त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर…असं अजित पवार अधिकाऱ्यांना म्हणाले.

उद्धव ठाकरेंचे आकांडतांडव

लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विमानतळावर बॅगेची तपासणी करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी वणी येथेही असाच प्रकार झाला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडीओ करत कर्मचाऱ्यांची उलट तपासणी केली. तो व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर टाकला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होती. या सभेतही बॅग तपासणीवर त्यांनी जोरदार टीका केली. माझ्या बॅग तपासा…पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बॅग का तपासत नाहीत? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत विचारला.

दफडणवीसांच्या बॅगचीही तपासणी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची देखील तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हिडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली असं म्हणत भाजप पक्षाकडून ठाकरेंवर टीका केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगचीही तपासणी झाल्याचा व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली होती. यावेळीचा व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे.

Previous Post

पंकजाताई पुन्हा वैद्यनाथ साखर कारखाना सुरू करणार…

Next Post

सासऱ्याचा विजयासाठी सुनबाईही सरसावल्या….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

सासऱ्याचा विजयासाठी सुनबाईही सरसावल्या....

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.