• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

लाडकी बहीण योजना बंद करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न-नरेंद्र मोदी

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 8, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

धुळे-महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा देशभरात होत आहे. काँग्रेस ही योजना बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ते कोर्टात पोहचले आहे. त्यांची सत्ता आली तर सर्वप्रथम ही योजना ते बंद करतील? असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी अनेक दशकापासून होती. परंतु मराठीला अभिजात भाषेचा दर्जा वर्षानुवर्ष सत्तेवर असलेल्या काँग्रेसने दिला नाही.आता काँग्रेसला धक्का बसला आहे. मोदी यांनी हे काम कसे केले, हा प्रश्न त्यांना पडला आहे. महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार जोरदार काम करत आहे. यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र पहिली पसंत राहिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात सांगितले. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पहिली सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रात वाढवण बंदराचे उद्घाटन नुकतेच मी केले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक विमानतळ करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावेळी मी काही बोललो नाही. परंतु आता ज्या दिवशी महायुती सरकारचा शपथविधी होईल, त्यानंतर राज्यसरकारसोबत आम्ही बैठक घेऊ. त्या बैठकीत वाढवण बंदराजवळ नवीन विमानतळाचा निर्णय घेण्याबाबत चर्चा होईल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

महाविकास आघाडीच्या गाडीत चाके नाही, ब्रेक नाही. तसेच चालकांच्या सीटवर बसण्यासाठी भांडणे होत आहेत. महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात आधी सरकारला लुटले. त्यानंतर विकास कामे थांबवली. त्यांनी मेट्रोची काम रोखली. समृद्धी महामार्गाचे काम थांबवले. त्यांनी महाराष्ट्रातील विकासाची प्रत्येक योजना थांबवली. त्यानंतर राज्यात महायुतीची सरकार बनली. त्यानंतर अडीच वर्षांत विकास चौफर झाला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विकास भरभरुन झाला आहे. आता महाराष्ट्रातील मतदारांनी लक्षात ठेवा महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.

महायुतीने वचननामा जाहीर केला आहे. त्यांच्या दहा वचनांची चर्चा होत आहे. जनतेच्या सूचनांमधून हा वचननामा तयार झाला आहे. महायुतीचा वचननामा विकसित भारताचा आधार बनणार आहे. विकसित महाराष्ट्र, विकसित भारतासाठी आमच्या बहिणींचे जीवन चांगले बनवणे गरजेचे आहे. महिला पुढे जातील तर संपूर्ण समाज प्रगती करेल. त्यामुळे मागील दहा वर्षांत केंद्र सरकारने महिलांना केंद्रात ठेऊन काम केले. महिलांसाठी आम्ही सर्व दरवाजे उघडले. त्यांना अधिकार दिले. महाराष्ट्राची महायुती सरकार केंद्राच्या पावलापाऊल ठेवून काम करत आहे. महिलांसाठी अनेक योजना सुरु आहे.

Previous Post

ज्योतिताईंनी शिवसंग्रामला सावरले;लढा देण्यास सज्ज..

Next Post

कुटेवर मोठी कारवाई; 333 कोटींच्या मालमत्ता जप्त….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

कुटेवर मोठी कारवाई; 333 कोटींच्या मालमत्ता जप्त….

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.