• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

लाडकी बहीण योजनेला सुप्रिया सुळेंचा पहिल्या दिवसापासून विरोध…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 7, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

रुपाली चकणकरांचे टीकास्त्र..

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना आणून त्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आर्थिक सक्षम करण्यासाठी पाठबळ दिलं आहे. ही योजना यशस्वी झाली आहे. राजकीय इतिहासातील ही पहिली योजना आहे जी, थेट सरकारमधून थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा होतात. ही योजना वाड्या, वस्ती आणि पाड्यावर राहणाऱ्या ज्या महिलांचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी लाभदायी ठरली आहे. ही योजना अक्षरश: महिला भगिनींनी डोक्यावर घेतली आहे. हेच दुखणं विरोधकांमध्ये निर्माण झालं आहे. त्यामुळं पहिल्या दिवसापासून सुप्रिया सुळे या योजनेला विरोध करतायत. स्त्री असताना त्यांनी या योजनेला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे असताना ही योजना फसवी योजना आहे, म्हणून त्या सांगत राहिल्याचे चाकणकर म्हणाल्या.

आत्मसन्मानाला ठेच……

लाडकी बहीण योजना ही निवडणुकीचा जुमला असल्याचे सुप्रिया सुळे सांगत राहिल्याचे चाकणकर म्हणाल्या. पैसे जमा झाल्यानंतर पैसे सरकार काढून घेतील अशीही वल्गना त्या करत आहेत. याही पुढे जाऊन त्या हायकोर्टात गेल्या. मात्र, कोर्टानंही त्यांना फेटाळलं. आता त्या सांगत आहेत की, 1500 रुपयांमध्ये महिलांना विकत घेता येत नाही. त्यांनी जवळजवळ 2 कोटी 40 लाख महिलांना या योजनेचा लाभ झालेला आहे. त्यामुळं सुप्रिया सुळेंनी महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवलेली असल्याचे चाकणकर म्हणाले. त्यांनी महिलांचा अपमान केला असल्याचे चाकणकर म्हणाल्या.

सुप्रिया सुळे माफी मागा…

काल महाविकास आघाडीने जेव्हा पंचसूत्री मांडली, त्यात महिलांना 3000 रुपये देण्याचे सांगितलं आहे. ते आता कोणत्या निकषवर देणार आणि 1500 दिल्यावर राज्य कर्जबाजारी होणार, असंही त्या म्हणत होत्या. त्यामुळं आता 3000 दिल्यांवर राज्य कसं चालणार? याचंही उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं पाहिजे. 2 कोटी 40 लाख महिलांची त्यांनी माफी मागावी. अन्यथा महिला भगिनींनी आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर, ज्या ज्या ठिकाणी तुतारीचा उमेदवार उभा असेल तिथे त्याला मतदान नं करणं, हाच अपमानाचा बदला घेण्याचा उपाय असल्याची टीका रुपाली चाकणकर यांनी केली.

Previous Post

वंचित बहुजन आघाडी जनसंपर्क कार्यालयाचे मोठ्या उत्साहामध्ये उद्घाटन

Next Post

एमआयडीसीचा फलक गळ्यात घालून चांगदेव गीतेंचा प्रचार..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

एमआयडीसीचा फलक गळ्यात घालून चांगदेव गीतेंचा प्रचार..

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.