गेवराई : प्रतिनिधी
गेवराई विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार प्रियांकाताई खेडकर यांनी बुधवार दि.६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिरस मार्ग फाटा येथे
जनसंपर्क कार्यालय चे उदघाटन ह भ प सुरेशानंद महाराज श्रृगऋषीगड शिंगारवाडी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
प्रियांकाताई खेडकर बोलताना म्हणाल्या शेती पाणी रस्ते रोजगार व वीज या प्रश्नाला प्राधान्य दिले जाणार येणाऱ्या पाच वर्षात या सर्व गोष्टींना प्राधान्य देत मतदार संघ सुजलाम सुफलाम करणार असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत ही निवडणूक विकास कामांच्या जोरावर लढवणार असल्याचे प्रियांका ताई खेडकर यांनी सांगितले.यावेळी गेवराई तालुक्यातील विधानसभा उमेदवार प्रियांकाताई खेडकर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अजयकुमार गायकवाड पदाधिकारी राजेंद्र पोकळे, भारत हवाले, राजेंद्र हराळे,बलभीम बारगजे, बाळू हराळे, बाबुराव कोळेकर, सुंदर मार्कड, सोमेश्वर कोळेकर, बबन पांढरे, करण काळे, नंदकुमार उघडे, भाऊसाहेब सातगणे, ज्ञानेश्वर माने, ओबीसी दलित मुस्लिम वंचित बहुजन आघाडी चे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. येणाऱ्या २० तारखेला गॅस सिलेंडर या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा, असे आवाहन केले आहे.