बीड विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वेगाने वाहत आहे. अपक्ष उमेदवार म्हणून अनिल जगताप यांनी उमेदवारी कायम ठेवली असून त्यांना शिलाई मशीन हे चिन्हही मिळाले आहे,त्यात त्यांना मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांचेही अप्रत्यक्ष सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण 10 आरक्षण समर्थक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत,या पार्श्वभूमीवर त्यांचे या निवडणुकीत पारडे जड झाले आहे.
बीड मतदार संघात यंदाचा आमदार म्हणून अनिल जगताप यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. अनिल जगताप यांना आमदार करण्यासाठी बीडमधील तळागाळातील माणसं मोठ्या ताकदीने उभी राहीली आहेत. जे आहे ते आणि जसं आहे तसं समोर वागणाऱ्या अनिल जगताप यांना यंदा विजयाचा गुलाल लागणार असे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःच्या व्यक्तिमत्वाची समाजावर छाप सोडली आहे. म्हणूनच बीडच्या राजकारणाची गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत नेहमीच चवीने चर्चा केली जाते. बीड जिल्ह्याच्या मातीत आजवर अनेक रत्न जन्माला आलेली आहेत. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात बीडच्या माणसांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठवत राज्यातच नव्हे तर देशभरात बीडचे नाव गाजावले आहे. य
बीडच्या राजकीय परिघात वावरणारी कर्तुत्ववान माणसं नेहमीच चर्चेचा भाग राहिलेली आहेत. यापैकीच एक म्हणजे अनिल जगताप होय.
भली मोठी उंची, दणकट बांधा, चेहऱ्यावर आकर्षक दाढी, धारदार नजर, गळ्यात भगवा गमचा आणि मर्दानी चाल, स्वभावात नम्रता, आपुलकी आणि गोडी, माणुसकीने नम्र व्यक्तिमत्व असं काहीसं वर्णन केलं की, अनिल जगताप यांची छबी डोळ्यासमोर उभी राहते. कुटुंबाचा कुठलाही राजकीय वारसा नसताना अखंडित समाजसेवा करणारा राजकारणी म्हंटलं की, बीडवासियांच्या तोंडात अनिल जगताप हे नाव नकळत येऊन जातं. गेल्या चाळीस वर्षांपासून अनिल जगताप यांची प्रामाणिकता बीडकरांनी पाहिलेली आहे म्हणूनच अनिल जगताप यांचा झंजावात विधान भवनाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचत आहे, अशी जनमानसात भावना आहे.