नमस्कार…!
दि.०२/११/२०२४
*॥ बलिप्रतिपदा ॥*
🟣 या दिवशी प्रातःकाळी अभ्यंग स्नान करावे.
(धर्मसिंधू)
🟣 या दिवशी रात्री घरात पाटावरती तांदूळाची बलिराजाची प्रतिमा काढावी.
श्री विष्णु देवतेचे सानिध्य प्राप्त होण्यासाठी पुढीलप्रमाणे संकल्प करून;बलिराजाची यथाविधी पूजा करावी.
(भविष्य पुराण-हेमाद्री)
🟣 संकल्प:- *मम श्रीविष्णुसानिध्यर्थं बलि पूजां करिष्ये ।*
असा संकल्प करून; पुढील मंत्राने पूजा करावी.
🟣 पूजेचा मंत्र :-
*बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभो ।*
*भविष्येंद्र सुराराते पूजेयं प्रतिगृह्यतां ॥*
पूजेनंतर खालील मंत्राने प्रार्थना करावी..
🟣 प्रार्थना मंत्र:- *बलिराज नमस्तुभ्यं दैत्यदानव वंदित ।*
*इंद्रशत्रो अमराराते विष्णुसांनिध्यदो भव ॥*
(पूजासमुच्चय)
🟣 बलिराजाच्या नावाने “सद्विप्रास” दाने द्यावीत.
बलीच्या उद्देशाने जी दाने दिली जातात ती अक्षय्य विष्णुची तृप्ती करणारे होतात.
(पद्मपुराण)
🟣 या प्रतिपदेला जर व्यक्ती दैन्यपणाने राहील तर वर्षभर दैन्य प्राप्त होईल. आणि जर हर्षाने (आनंदाने) राहील तर वर्षभर आनंद प्राप्त होतो.
(धर्मसिंधू)
🟣 या दिवशी प्रातःकाळी मनुष्यांनी द्यूत खेळावे.
यात जय प्राप्त झाल्यास वर्षपर्यंत जय प्राप्त होतो.
पराजय झाला असता तो “लाभाचा” नाश करतो.
ही रात्र स्वस्त्री – परिवार सहित मोठ्या आनंदाने घालवावी.
(ब्रह्मपुराण -हेमाद्री)
🟣या दिवशी प्रदोषकाळी दिवे लावल्यास; लक्ष्मी सार्वकाल स्थिर रहाते.
दिवे लाऊन ओवाळावे. असा विधी असलेने या प्रतिपदेला “दीपावली” म्हणतात.
卐 हे केशवा; या बलिराज्याचे दिवशी ज्यांनी दीपांची पड़्ति लावली नाही;त्यांचे घरी *”दिवे”* कसे लागणार ???
(धर्मसिंधू)
🟣 या दिवशी ; विपुल गो-धन प्राप्ती तसेच क्षेमाऽयु, पुष्टिसाठी ; प्रातःकाळी गोमयाचा गोवर्धन पर्वत करून; त्याची संकल्प पूर्वक; पूजा करावी.
🟣 संकल्प :- *मम श्रीकृष्ण प्रीतिद्वारा सकल पापक्षय पूर्वकं कोटिशः धेनु प्राप्ति पुष्ट्यायुः क्षेमादि सिद्ध्यर्थं गोवर्धन सहित श्रीगोपाल पूजनं गोवृंद पूजनं च करिष्ये ।*
असा संकल्प करून गणेशपूजा- कलशपूजा करावी.
🟣 *बलिराज्ञो द्वारपालो भवान् अद्य भवत् प्रभो। निजवाक्य अर्थनार्थाय स गोवर्धन गोपते ॥*
या मंत्राने गोवर्धन आणि गोपालांचे आवाहन करावे.
अनेक प्रकारच्या नैवेद्य आदींसह षोळशोऽपचार पूजा करावी.
🟣 *गोपालमूर्ते विश्वेश शक्रोऽत्सव विभेदक । गोवर्धन कृतच्छत्र पूजां मे हर गोपते ॥*
*गोवर्धनधर आधार गोकुलत्राण कारक। विष्णुबाहु कृतच्छाय गवां कोटिप्रदो भव ॥*
या दोन मंत्रांनी गोपाळकृष्णांची प्रार्थना करावी.
या सोबतच “गोवत्सांची” देखील पंचोऽपचार पूजा करावी.
🟣 *लक्ष्मीर्या लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता । घृतं वहति यज्ञार्थे मम पापं व्यपोहतु ॥*
या आणि अशाप्रकारच्या अनेक मंत्रांनी गायीची स्तुती आणि पूजा करावी.
🟣 गायींच्या सुखासाठी यज्ञ करावा.
(आपल्याकडे यज्ञाचे विधान उपलब्ध आहे.)
🟣 विप्रांना, सुहृदांना; विशेष अन्नांनी भोजन द्यावे.
🟣 विप्रांना-गाय, दीनांना-भोजन, गायींना-यव सम अन्न , गिरीला- बलि; द्यावे.
🟣 गायींना शरदऋतूतील पुष्पांनी अलंकृत करावे.
स्वतः “एकभुक्त” राहून; अलंकार धारण करून; परिवार सहित; ब्राह्मण, गाय, होम, गोवर्धन पर्वत यांच्या प्रदक्षिणा कराव्यात.
🟣 या दिवशी गायीची धार काढणें, बैलांकरवी भारवाहणें इत्यादी करूं नये.
(स्कंदपुराण- हेमाद्री/निर्णयांमृत)
🟣 *मार्गपाली बंधन :-*
या दिवशी कुशांची व काशतृणांची (बहुत लुंबकांनी युक्त) सुंदरअशी *मार्गपाली* रज्जू ( म्हणजे दोरी) तयार करावी.
🟣 ती दोरी उंच अशा खांबाला आणि मोठ्या वृक्षाला बांधावी.
या दोरीला पुढील मंत्राने ( अभिमंत्रित करून) नमस्कार करावा.
🟣 मंत्र :-
*मार्गपाली नमस्तेस्तु सर्व लोक सुखप्रदे । विधेयैः पुत्रदाराद्यैः पुनरेहि व्रतस्य मे ।*
अशाप्रकारे नमस्कार आदी करून झाल्यावर; सायंकाळी त्या दोरीच्या खालून गायी, घोडे , पाळीवप्राणी, स्त्रियां पुत्रांसह गावातील सर्व लोकांनी त्या *”मार्गपाली”* च्या खालून जावे.
*अशाप्रकारे “मार्गपाली” चे उल्लंघन केल्यास;*
(उल्लंघन करणारें) *सर्व जण सुखी आणि निरोगी होतात.*
(स्कंदपुराण)
🟣 या दिवशी नारीकतृक नीरांजन विधी करावा.
नूतन वस्त्र धारण करावे. वहीपूजन आदी करावे .
(धर्मसिंधू)
🟣 *उपरोक्त “अभ्यंग स्नाना” शिवाय सांगितलेली सर्व कर्मे स्वकुळातील आचार परंपरेनुसार करावी.*
*॥ शुभदीपावली ॥*
वे.शा.सं.अमोलशास्त्री जोशी,
श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
श्रीगुरुदेव दत्त…!