बीड विधानसभा मतदारसंघातून तिसरे क्षीरसागरही विधानसभा निवडणुकी उतरणार असून आज त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले .हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नाही तर निवडून येण्यासाठी ,भरतो आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला, मात्र कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार आहे हे त्यांनी स्पष्ट केले नाही .
बीड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत, महायुतीत ही जागा कुणाला सुटते यावर येथील उमेदवार ठरणार आहे .त्याआधीच डॉक्टर योगेश भारतभूषण क्षीरसागर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. बीड विधानसभा मतदारसंघात आपल्याला बरीच विकास कामे करायचे आहेत आणि ही विकास कामे फक्त मीच करू शकतो असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. मी विकासासाठी कोणाशीही चर्चा करायला तयार आहे मीच फक्त विकासाचा प्रश्नावर बोलतो .गेल्या पाच वर्षात मी विकास कामे करून शहरात आणि ग्रामीण भागात पोहोचलेलो आहे म्हणून जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे. यावेळी त्यांनी केलेल्या विकास कामाची यादीच वाचून दाखवून ते म्हणाले की, माझा विजय निश्चित आहे . कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाच्या घोषणा देत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.