दि.२८|१०|२०२४
*॥ वसुबारस- गोवत्स द्वादशी ॥*
🟣 या दिवशी
आपल्या अनेक प्रकारच्या कामनापूर्तीसाठी *प्रदोषकाळी* (सायंकाळी ०६.०० ते ०८.३१ पर्यंत) सवत्स गायीचे पूजन करावे.
हे पूजन केल्यास; गायीच्या अंगावरती जितके “रोम” (केस) असतील तितके वर्ष पर्यंत (देहान्ते) “स्वर्गप्राप्ती” होईल असे वचन आहे.
🟣 याचा (संक्षिप्त) विधी..
आचमनादीकृत्वा देशकालौ संकीर्त्य …
संकल्प:- *मम इह जन्मनि जन्मांतरेच अखिल कामना सिद्धिद्वारा गो-रोम कोटि वर्ष पर्यंत स्वर्वास कामः गोवत्स द्वादशी व्रत कल्पोक्त फलावाप्तये सवत्स गोः पूजां करिष्ये ।*
असा संकल्प करून; कलशपूजा इ करावी.
संभारप्रोक्षणांते..
*नमो गोभ्यःश्रीमतिभ्यः सौरभेयीभ्य एव च । नमो ब्रह्मसुताभ्यश्च पवित्राभ्यो नमोनमः ॥*
या मंत्राने सवत्सगायीचे ध्यान करावे.
🟣 *॥ श्री रुद्ररूपिण्यै गवे नमः॥*
या मंत्राने गायीचे षोळशोपचार पूजन करावे.
हा पूजा विधी विस्तृत असलेने सर्व पूजा टाईप करून पाठविणे समयाऽभावी शक्य होत नाहिये.
🟣 या पूजेमध्ये; गायीच्या कोण- कोणत्या अवयवांमध्ये कोण कोणत्या देवतांचा निवास असतो हे सांगितलेले आहे.
गायीच्या त्या त्या ठिकाणी स्पर्श करून; *”न्यास”* करावयाचे आहेत.
🟣 पुष्पांजली अर्पण करून; पुढील मंत्राने गायीची प्रार्थना करावी..
प्रार्थना मंत्र:-
*गावो मम अग्रतः सन्तु गावो मे सन्तु पृष्ठतः। गावो मे हृदये नित्यं गवां मध्ये वसामि अहम् ॥*
*सुरभिः त्वं जगन्मातः नित्यं विष्णुपदे स्थिते । सर्व देवमये देवि सर्व देवैः अलंकृते ॥*
*मातः मम अभिलाषितं सफलं कुरु नंदिनि*
अशी प्रार्थना करावी.
🟣 तांब्याच्या पात्रात पाणी घ्यावे. त्यात गंध-पुष्प अक्षदा टाकून; पुढील मंत्राने गायीला “अर्घ्यदान” करावे .
अर्घ्यदान मंत्र:-
*क्षीरोदार्णव संभूते सुराऽसुर नमस्कृते । सर्व देवमये मातः गृहाणार्घ्यं नमोस्तुते ॥*
असे म्हणून गायीच्या पायापाशी अर्घ्यदान करावे.
(गायीच्या पायाशी दिलेल्या)
*या अर्घ्यदानाचे पाणी आणि त्यातील अक्षदा स्वतःच्या मस्तकावर धारण (प्रोक्षण) कराव्यात.*
🟣गायीला; (तेलात तळलेल्या) उडीदाच्या वड्यांचा नैवेद्य दाखवावा.
🟣 या दिवशी; गायीचे दूध-दहि-तूप-ताक तसेच थाळीतील पदार्थ आणि तेलात तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
🟣 याच द्वादशी पासून पुढे पाच दिवस पर्यंत रोज; माता इ.सर्व स्त्रियांनी; देव, ब्राह्मण, गाई, घोडे, ज्येष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ या सर्वांना “नीरांजन विधी” (औक्षण) करावे.
वे.शा.सं.अमोलशास्त्री जोशी.
श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५
श्रीगुरुदेव दत्त..!