• Contact Us
  • Home
Sunday, August 3, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 27, 2024
in ताज्या बातम्या
0

जयदत्त क्षीरसागर यांचे जबरदस्त शक्तिप्रदर्शन.

बीड- बढता बढता कारवा बन गया अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्व. काकू – नाना हे आपल्यासाठी शक्तीपीठ आहे आपण एवढा मोठा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आता आपण स्वयंपूर्ण आहोत सर्वांनी साथ दिली तरच पुढचा डाव जिंकता येईल असे भावनिक आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

रविवार दि.27 रोजी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे आगमन होणार असल्याची माहिती मिळतात तरुण कार्यकर्त्यांनी पाडळसिंगी टोल नाक्यापासून ते बीड शहरापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढून स्वागत केले 2000 गाड्यांचा ताफा जेव्हा शहरातून जात होता तेव्हा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर देखील भारावून गेले होते. रस्त्यात ठीक-ठिकाणी लोकांचा समुदाय त्यांच्या स्वागतासाठी उभा होता. अनेक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी तोफांची सलामी देत आपल्या लाडक्या नेत्याचे स्वागत केले.

स्व.काकू-नाना यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला, ते म्हणाले स्व.काकू-नाना हे आपल्यासाठी शक्तीपीठ आहे आपला एवढा मोठा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मला प्रेरणा देणार आहे सगळ्याला फाटा देऊन स्वयंपूर्ण होत पुढे जातोय नातेगोते तुटतात काळाच्या ओघात दुरावा निर्माण होऊ लागला आहे सामाजिक वीण विस्कटू लागली आहे. आपण आज मला मोठा प्रतिसाद दिला उतणार नाही मातणार नाही घेतला वासा टाकणार नाही हे मी आज सर्वांसमोर जाहीर करतो अनेक चढउतार अनेक वळणे बघितली अनेकांनी मला आग्रह केला. आपण सहा महिन्यापासून आपल्या तयारीला लागलो आहोत. वाट लावणारे पुढे येत आहेत पण वाट दाखवणारा असावा लागतो याची जाण आणि भान या मतदारसंघातील लोकांना आहे.

सगळा बाजार भरलाय डिजिटल सारेच दिसू लागले आहेत परंतु वस्तुस्थिती काय असा प्रश्न निर्माण होतो कोण कुणीकडे जातोय याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. करता करविता परमेश्वर आहे, नियती सर्वांचा हिशोब करत असते लोकशाहीत असेच आहे लोक संधी देऊन बघतात आपण आपला वसा आणि वारसा नुसार चालावं लागतं पण आज कुणाचा आदर्श घ्यावा असा कोणी आहे का असा प्रश्न आहे. समरसतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकशाहीत कुठलातरी निर्णय घ्यावा लागतो आता आपण स्वयंपूर्ण आहोत सर्वांनी साथ दिली तर पुढचा डाव जिंकता येईल जात-पात बाजूला ठेवून आपण सर्वजण पुढे जाऊया आपला आरसा स्पष्ट आहे. वास्तव आणि वस्तुस्थिती सर्वांसमोर आहे आपण आपला अधिकार यासाठी वापरण्याची वेळ आली आहे. 20 तारखेला आपली ताकद दाखवावी लागेल मी सेवेचे व्रत घेतले आहे माझ्याकडून सेवा करून घेणे हे आपले काम आहे तुम्ही पोटतिडकीने बोलता तसे काम करा आपण वाट बघितली थांबलो देखील पण आपलं मूळ आपल्याला विसरता येणार नाही आपला विश्वासाचा धागा आहे तो कधीही तुटू देणार नाही माझ्या जागी आपणच आहात असे समजून तुम्ही चमत्कार करा

उद्या दिनांक 29 तारखेला अर्ज भरणार आहोत ही निवडणूक भाग्यरेषा बनवणारी आहे आपल्याला जे साध्य करायचे यासाठी समर्थ साथ द्या लोकशक्ती हीच माझी शिदोरी आहे आता दिवाळी आहे फटाके तर वाजत असतात परंतु आपले फटाके हे विजयाचे फटाके वाजले पाहिजेत असा दृढ निश्चय करा असे आवाहन करून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित जनसमुदायास भावनिक आवाहन केले.
यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे सर्व प्रमुख समर्थक, कार्यकर्ते, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

बीडच्या भूमिपुत्राला माळशिरसला संधी तर आष्टीत सुरेश धस….

Next Post

बाबा सिद्धिकी प्रकरणात मोठा ट्विस्ट…लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्या केलीच नाही?

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post
बाबा सिद्धिकी प्रकरणात मोठा ट्विस्ट…लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्या केलीच नाही?

बाबा सिद्धिकी प्रकरणात मोठा ट्विस्ट…लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्या केलीच नाही?

ताज्या बातम्या

कामधेनू केअर सेंटर ही काळाची गरज-पाचपोर महाराज.

July 31, 2025

उद्योजक प्रकाश सुलाखे डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृती पुरस्काराने सन्मानित

July 28, 2025

पुन्हा भेटताही येत नाही…! विसरता ही येत नाही…!

July 12, 2025

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.