
भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी ज्येष्ठ आणि जुने निष्ठावंत कार्यकर्ते शंकर देशमुख यांची निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली आहे. जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्रही त्यांना दिले आहे ,या निवडीमुळे गेल्या अनेक वर्षानंतर भाजपामध्ये एका संघ विचाराच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना भाजपात निर्माण झाली असून या निवडीचे सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

शंकर देशमुख हे बीड जिल्ह्यातील कड्याचे रहिवाशी असून गेली अनेक वर्ष ते भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत . त्यांनी भाजपात विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत, निष्ठावंत कार्यकर्त्यांत ज्या भाजप कार्यकर्त्यांचा नेहमी आदराने उल्लेख केला जातो अशा शंकर देशमुख यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर होते ,गेल्या दोन टर्म भाजपाने सोशल इंजिनिअरिंग जुळवून आणण्यासाठी रमेश पोकळे आणि नंतर राजेंद्र मस्के यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती, आज हे दोन्ही माजी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षात नाहीत .विधानसभा निवडणुकीत भाजपा सारख्या सर्वात मोठ्या पक्षाला जिल्हाध्यक्ष नसणे हे अडचणीचे ठरले असते. जिल्हाध्यक्षपद आपल्यालाच मिळावे यासाठी बीड जिल्ह्यातून अनेक इच्छुकांनी प्रयत्न केले पण आज एका निष्ठावंत कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने न्याय दिला आहे. आगामी काळात आपण पक्ष वाढीसाठी सतत कार्यरत राहू आणि पक्षाला अजून वैभवाच्या शिखरावर घेऊन जाऊ अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी दिली आहे.
कोण आहेत शंकर देशमुख
शंकर अनंतराव देशमुख (मु.पो. कडा, ता. आष्टी, जि.बीड) हे पदवीधर असून त्यांनी यापूर्वी चे भाजपा मध्ये आष्टी तालुका भाजपा अध्यक्ष, बीड जिल्हा भाजपा सरचिटणीस, जिल्हा समन्वयक ( बीड लोकसभा), स्विय सहायक भाजप आमदार (भीमराव धोंडे), लोकसभा प्रभारी २०२४ (मध्य प्रदेश) अशी पदे आणि जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
वडिलांचे नाव:- अनंतराव कृष्णराव देशमुख
आईचे नाव:- सौ. प्रेमल अनंतराव देशमुख
वडिलांपासून अनंतराव कृष्णराव देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहेत, तर आई सौ.प्रेमल या पण सामाजिक कार्यात सक्रिय होत्या,अयोध्येत
राम मंदिर कारसेवेमध्ये वडीलांसोबत सहभाग.
वाराणसी ( उत्तर प्रदेश) येथे वेदशस्त्राचे शिक्षण.
वडिलांना ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा सहवास.महाराष्ट्रातील दिवंगत भाजपा नेते प्रमोदजी महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत भाजपा मध्ये कार्यास सुरुवात.भाजपा नेते नितीनजी गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा ताई मुंडे, देवेंद्र फडणवीस यांच्या सह अन्य दिग्गज नेत्यानं सोबत वैयक्तिक संपर्क आणि संबंध.