बंडखोरीच्या बातम्या म्हणजे फुगलेली बेडकुळी ; विनाकारणच्या प्रोत्साहनामुळे राजकीय कारकीर्द धोक्यात
अलीकडे होत असलेल्या बंडखोरीला विनाकारण फुगवून प्रसारित केले जात असल्याचे चित्र आहे, या नेत्यामुळे या पक्षाला खिंडार त्या पक्षाला खिंडार अशा बातम्या उडवल्या जात आहेत मात्र स्थानिक लोकांना या अशा बंडखोरांची खरी कुवत काय आहे हे माहीत असते त्यामुळे त्या नेत्यांचे त्यांच्या त्यांच्या गावात हसे होत आहे तर बाहेर मात्र उगीच या अशा नेत्यांच्या बंडखोरीमुळे खरेच त्या पक्षाला मोठे खिंडार पडले आहे की काय असे वाटत आहे.
निवडणुकीचा मोसम सुरू झाल्यामुळे आयाराम गयाराम प्रवृत्तीला वेग आला आहे , अशा पक्षांतराच्या बातम्या माध्यमांमध्ये मोठ्या करून आणि रंगवून छापल्या जात आहेत, प्रसारित केल्या जात आहे मात्र प्रत्यक्षात काही बंडखोरांची त्यांच्या मतदारसंघातील उंची कुवत आणि स्थिती पाहिली की हा प्रकार किती फोल आहे हे दिसून येत आहे. विशेषतः माध्यमांना पण ज्या पक्षाचा विरोध करायचा आहे अशा पक्षातील एखादी फुटकळ बंडखोरी सुद्धा अशी काही रंगवून प्रसारित करीत आहेत की, उद्या खरेच या बंडखोरीचा मोठा फटका संबंधित पक्षाला बसेल .
असाच प्रकार बीड मधील काही बंडखोरांच्या बाबतीतही दिसून येतो आहे, एखाद्याला कुवत नसताना दीर्घकाळ एखाद्या पक्षाचे मोठेपद दिल्यावर तो आपण खरेच मोठे आणि प्रभावी नेते आहोत असे समजायला लागतो आणि नंतर फसतो अशीच बीड मधील बड्या म्हणवल्या जाणाऱ्या एका पदाधिकाऱ्याची बंडखोरी आहे. अलीकडच्या काळात या मोठ्या पदाधिकाऱ्याला त्याच्या गावातही दोन आकडी मतसंख्या गाठता आलेली नाही पण आव मात्र असा की आपणच उद्याचे आमदार ! त्यात पुन्हा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातच आगामी विधानसभा निवडणुकीत ‘हा’ उमेदवार असेल असे जाहीर केल्यामुळे त्याच्या दंडातली बेंडकुळी विनाकारण फुगलेली आहे , आपल्यालाच विधानसभेची उमेदवारी मिळेल या आशेवर त्याच्या सर्व हालचाली सुरू होत्या त्यात प्रत्येक उमेदवाराला अंतरवाली सराटीत जाऊन आशीर्वाद घ्यायचा असतो तसा तो यानेही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्यातील एका बड्या नेत्याचा उपस्थितीत त्यांनी त्या पक्षात प्रवेशही केलेला आहे मात्र या पक्षाची उमेदवारी त्याला मिळण्याची अजिबात शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर ही बंडखोरी म्हणजे एक अनावश्यक रंगवलेल्या चर्चेचा भाग आहे असे दिसून येते आहे, एकदा त्या पक्षाचे उमेदवार जाहीर झाले की या बंडखोरालाही त्याची नेमकी काय जागा आहे हे समजून येईल .
तेव्हा त्याची अवस्था ‘न घरका न घाट का ‘ अशी होईल, पक्षांतराचा नाद लागलेल्या हा बंडखोर पुढच्या निवडणुकीत आ तो ज्या पक्षात गेला आहे त्याच पक्षात राहील याचीही खात्री नाही. फार फार तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्याला या त पक्षाचे तिकीट मिळेल पण तिथेही तो निवडून येण्याची शक्यता आज तरी दिसत नाही.