
काही दिवसांपूर्वी महायुती सरकार महायुती सरकार ‘मराठा, ओबीसी, धनगर यांच्या आरक्षणासह बहुजनांचे प्रश्न सोडवू शकले नाही’असं विधान पत्रकाद्वारे करणाऱ्या आ. सतीश चव्हाण यांची अजितदादानी त्यांच्या राष्ट्रवादीतुन हकालपट्टी केली आहे.
होतं.खरंतर दीड वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी आहे. तरीही, अशाप्रकारचं विधान येत त्यांच्याकडून आल्यामुळे खळबळ उडाली होती.तसेच चव्हाण यांचे हे विधान म्हणजे महायुती सरकारला घरचा आहेरच मानला गेला होता.त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने कडक भूमिका घेतली आहे.चव्हाण यांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रम जाहीर करताच सतीश चव्हाण यांनी महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत प्रसिद्धि पत्रक काढले होते. त्यात त्यांनी बहुजनांचे प्रश्न सोडवण्यात महायुती सरकार अपयशी ठरल्याचा चव्हाण यांनी आरोप केला होता.आमदार सतीश चव्हाणांच्या पत्राची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी चांगलीच दखल घेतली होती., आमदार चव्हाण यांच्यावर दोनच दिवसांत ‘राजकीय’ कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आता सतीश चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.
चव्हाण यांना पक्षात घेतले, गंगापूरचे तिकीटही दिले तर आम्ही बंडखोरी करू, असा थेट इशाराच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आमदार चव्हाण यांना जिल्हाभरातून विरोध होत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी सांगितले होते.