मुंबई : सध्या राज्यात पावासाचा जोर कमी झाला आहे. अनेक भागात गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसानं धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा काही जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिलाय.
राज्यात कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासात सर्वदूर मुसळधार सरींच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे.
सुनीता विल्यम्सला परत आणण्यासाठी स्पेस एक्स रॉकेट लाँच!
आज रविवारी (29 सप्टेंबर) विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा व नागपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर राज्यभरात चढलेला होता. आता हळूहळू कमी दाबाचा पट्टा पुढे सरकल्याने राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा वाढणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोल्हापूर सांगली तसेच कोकणातील सिंधुदुर्गात पुढील दोन दिवस वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहण्याचा अंदाज ही देण्यात आलाय.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आला नसला तरी व मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर आणि कोकणातील सिंधुदुर्गात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.