• Contact Us
  • Home
Friday, February 6, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

लाडक्या बहिणींनो! तुमची प्रतिक्षा संपली, पाहा तिसरा हप्ता आला की नाही?

38 लाख 98 हजार 705 भगिनींना 584.8 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
September 30, 2024
in ताज्या बातम्या, राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
लाडक्या बहिणींनो! तुमची प्रतिक्षा संपली, पाहा तिसरा हप्ता आला की नाही?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा केले जात आहेत. याबाबत सरकारने अधिकृतपणे माहिती दिली आहे. याबाबत महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकृतपणे माहिती दिली आहे.

आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स खात्यावर तिसऱ्या टप्प्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक 26 सप्टेंबर रोजी 38 लाख 98 हजार 705 भगिनींना 584.8 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे.

उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व पात्र भगिनींना महिन्या अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता, त्यांना तीसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता, त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत, असं आदिती कटकरे यांनी सांगितलं.

लाकडी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून प्रतिमहिना 1500 रुपये याप्रमाणे लाभ दिला जात आहे. मात्र कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत.

ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाहीये, त्यांच्यादेखील बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत. त्यामुळेच अद्याप एकही हप्ता न आलेल्या महिलांनी बँक खाते आधार क्रमांकाशी लवकरात लवकर जोडून घ्यावे, असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. बँक खाते आणि आधार क्रमांक एकमेकांना जोडण्याची अट अजूनही कायम आहे.

ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांच्या बँक खात्यात सरकारने एकदाच दोन महिन्यांचे 3000 रुपये पाठवले आहेत. मात्र अर्जात त्रुटी असल्यामुळे अनेक महिलांना हे पैसे मिळालेले नाहीत. ज्या महिलांनी आपल्या अर्जातील त्रुटी दूर केलेली आहे, अशा महिलांना तीन हप्त्याचे एकूण 4500 रुपये दिले जातील.

सांगलीत विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू!

Previous Post

सांगलीत विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू!

Next Post

राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.