मुंबई/प्रतिनिधी
विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शंखनाद अशी पोस्ट केली आहे. यासोबत फडणवीसांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्र असणार आहेत. महाराष्ट्रात पुरुष मतदारांची संख्या ४.९७ कोटी आहे, तर महिला मतदारांची संख्या ४.६६ कोटी आहे. तरुण मतदार १.८५ कोटी आहेत. तर २९.९३ लाख नवीन मतदार आहेत. असे एकूण राज्यात ९.३५ कोटी मतदार निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत.
२२ तारखेला निवडणुकीची अधिसुचना जाहीर होणार आहे. तर २९ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार आहे. ३० तारखेला अर्जाची छानणी होणार आहे. तर ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती आहे. तर महाविकासआघाडीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची युती असणार आहे. या शिवाय मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि इतर छोटे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत.