राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिवाळीसाठी एक खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सरकारने असे जाहीर केले आहे की, दिवाळीच्या सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना 3000 रुपयांचं बोनस दिलं जाईल.
लाडकी बहिण योजना .
महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मुली व महिलांना दरमहा 1500 रू दिले जाणार आहेत. तर ही मदत महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी दिले जाणार आहे. तर महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू केली आहे.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिवाळीसाठी एक खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. दिवाळीच्या सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना 3000 रुपयांचं बोनस दिलं जाईल. ही रक्कम महिन्याला नियमित मिळणारे पैसे वगळून दिली जाईल. काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाईल. याप्रकारे काही महिलांना एकूण 5500 (3000+2500) रुपयांचा लाभ मिळणार आहे. दिवाळीचा बोनस फक्त लाडकीबहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे. यासाठी या अटी पूर्ण कराव्या लागतील.
महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
*त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
*त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
प्रत्यक्ष अर्ज कसा करावा?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे पण तुमच्या जवळ मोबाईल फोन नाही किंवा तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यासंदर्भात तुम्ही खालील दिलेल्या प्रक्रियेनुसार तुम्ही स्वतःचा प्रत्यक्ष अर्ज सादर करू शकतात, त्याची प्रक्रिया खालील प्रमाणेलाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्ष अर्ज करण्यासाठी तुम्हाला योजनेचा आवश्यक कागदपत्रे तयार करून तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत/सेतू केंद्र/अंगणवाडी केंद्र/महिला व बालकल्याण विभाग या कोणत्याही एका ठिकाणी जाऊन या योजनेसाठी तुम्ही प्रत्यक्ष अर्ज सादर करू शकताह, या कार्यालयाच्या अधिकाऱ्याद्वारा आपले अर्ज योजनेच्या अधिकृत पोर्टल मार्फत ऑनलाईन केले जाईल काही दिवसानंतर कार्यालयाला त्यांना भेट देऊन अर्जाची पावती मिळू शकेल.