छतरपूर: मध्य प्रदेशमधील छतरपूरमध्ये वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामुळे मध्यप्रदेशसह देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. संपूर्ण देशामध्ये महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहे. अशा घटना फक्त घराबाहेरच नाही तर घरामध्ये देखील होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जन्मदात्याने वडीलांनीच पोटच्या मुलीवर अत्याचार केली असल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 4 वर्षे तो व्यक्ती मुलीवर अत्याचार करत असल्याचे उघड झाले आहे.
छतरपूरमधील या धक्कादायक घटनेत, एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या मुलीवर चार वर्षांपासून अत्याचार केले असल्याचे समोर आले आहे. 21 वर्षांच्या या मुलीवर तिचा बाप मागील चार वर्षांपासून अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात ही भीषण घटना समोर आली आहे. मुलीने त्याच्याविरुद्ध स्वतः येऊन तक्रार केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीने पळ काढला. यानंतर पोलिसांनी नराधम आरोपीचा शोध सुरु केला असून मध्य प्रदेश पोलीस त्याला पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.
लवकुशनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा गुन्हा घडला आहे. मुलीने वडीलांवर गंभीर आरोप केल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे. पीडित मुलीने हा प्रकार चार वर्षे सुरु असून धमकावून आणि घाबरुन वडिलांनीच शरीर संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे.
ही मुलगी आता 21 वर्षाची असून 18 वयाची असल्यापासून पीडित मुलीवर अत्याचार सुरु होते. याबाबत तिने घरच्यांना आणि परिवारातील लोकांना देखील सांगितले. मात्र कुटुंबातील कोणीच तिची मदत केली नाही. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचे वडील तिला धमकी देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायचे. वडिलांनी तिच्यावर चार वर्षे सतत बलात्कार केला. तिने बलात्काराची घटना घरच्यांना सांगितल्यावर तिला कोणीही मदत केली नाही. अखेर पीडित मुलीने हिंमत दाखवत तब्बल चार वर्षांनी लवकुशानगर पोलीस ठाणे गाठले. तिने वडिलांविरोधात पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली.
दरम्यान, छतरपूरचे एसपी आगम जैन यांनी प्रकरणाबद्दल अधिकची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्यासह बलात्काराच्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याच्यावर 10 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.