बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिका 2-0ने हरल्या नंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला पुन्हा एकदा अपमानजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे पराभवाचा भीतीने मूलतानच्या पाटा खेळपट्टीवर हा कसोटी सामना खेळवला गेला,पहिला डाव घोषित करण्याचा निर्णय इंग्लंडच्या फलंदाजानी पाकिस्तानवर ऐतिहासिक फलंदाजी करून उलटवला आणि पुन्हा एक लाजिरवाणा पराभव पाकिस्तानच्या नावावर नोंदवला गेला,इंग्लडने ही कसोटी 47 धावांनी जिंकली.
हॅरी ब्रुक आणि जो रूट यांच्या ऐतिहासिक इनिंगच्या जोरावर इंग्लंड मुलतान टेस्टमध्ये विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. इंग्लंडने त्यांची इनिंग 7 विकेट गमावून 823 रनवर घोषित केली.: हॅरी ब्रुक आणि जो रूट यांच्या ऐतिहासिक इनिंगच्या जोरावर इंग्लंड मुलतान टेस्टमध्ये विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. इंग्लंडने त्यांची इनिंग 7 विकेट गमावून 823 रनवर घोषित केली.800 रनचा विक्रम
टेस्ट क्रिकेटमध्ये फक्त चौथ्यांदा 800 रन झाल्या आहेत तसंच टेस्ट क्रिकेटमधला हा चौथा मोठा स्कोअर आहे. टेस्टमध्ये सर्वाधिक स्कोअरचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेने 1997 साली भारताविरुद्ध 6 विकेट गमावून 952 रनवर इनिंग घोषित केली होती. 1938 साली इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 903/7 एवढा स्कोअर केला होता. तर इंग्लंडनेच 1930 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 849 रन केले होते.
जो रूटचे द्विशतक
जो रूटने 262 रन करून त्याच्या करिअरची सर्वोत्तम खेळी केली. या खेळीदरम्यान जो रूट इंग्लंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडूही बनला, त्याने एलिस्टर कूकला मागे टाकलं. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रूट हा सचिन, पॉण्टिंग, कॅलिस आणि द्रविडनंतर पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.ब्रुकची ट्रिपल सेंच्युरी
हॅरी ब्रूकचे त्रिशतक
हॅरी ब्रुकनेही 317 रनची मॅरेथॉन इनिंग खेळली. टेस्ट क्रिकेटमधला हा 20 वा सर्वोत्तम स्कोअर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा ब्रुक इंग्लंडचा सहावा बॅटर ठरला आहे. 1990 साली ग्रॅहम गूच यांनी भारताविरुद्ध त्रिशतक केल्यानंतर इंग्लंडकडून केलं गेलेलं हे पहिलंच त्रिशतक होतं.
रूट-,ब्रूकची 454 ची भागीदारी
रूट आणि ब्रुकनी 454 रनची पार्टनरशीप केली, इंग्लंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये चौथ्या विकेटसाठी झालेली ही सगळ्यात मोठी पार्टनरशीप होती. चौथ्या क्रमांकावर केलेल्या सगळ्यात मोठ्या पार्टनरशीपचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्या नावावर आहे. या दोघांनी 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 624 रनची पार्टनरशीप केली होती.
या सामन्यात पाकिस्तानच्या 6 बॉलरनी 100 पेक्षा जास्त रन दिले. टेस्ट क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा असं घडलं