• Contact Us
  • Home
Sunday, June 8, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

पत्रकार, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आर्थिक विकास महामंडळ,मंत्रिमंडळ बैठकीत 80 निर्णय

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 10, 2024
in ताज्या बातम्या
0
पत्रकार, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आर्थिक विकास महामंडळ,मंत्रिमंडळ बैठकीत 80 निर्णय

राज्यातील विधानसभा निवडणुकांची बिगुल पुढील आठवड्यात वाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आज महायुती सरकारच्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक आज संपन्न झाली.याबैठकीत जवळपास 80 निर्णय घेण्यात आले असून काही नव्याने महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये, पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आर्थिक विकास महामंडळ, संत गोरोबा कुंभार महामंडळ व कोळी समाज महामंडळाचा प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच, मंत्रिमंडळाची आजची बैठक रेकॉर्ड ब्रेक झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षकांचा विषय घेण्यात आला आहे, जो शिक्षणमंत्री सांगतील. त्यासोबतच, आजच्या कॅबिनेटमध्ये लेवा पाटील समाज महामंडळाला मंजुरी देण्यात आली आहे. पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळासही कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. तर, ओबीसी नॉन क्रिमीलेयरचा उत्पन्न टप्पा 15 लाखांपर्यंत नेण्यात येत आहे, त्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून ते प्रसिद्ध पत्रक रद्द करण्यात आल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली. मात्र, आजच्या बैठकीत मराठा आरक्षणाचाविषय घेण्यात आला नव्हता, अशी देखील माहिती पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

गुजर, लेवा पाटील समाजासाठी महामंडळ

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय घेण्यात आला, विशेष करून मराठवाड्यातील समाज आहेत, गुजर समाज, लेवा पाटील समाज आहे, मोठ्या प्रमाणात गुजर समाजात गरिबी आहे. तसेच, लेवा पाटील समाज महामंडळ करण्यात आले आहे, त्या समाजात गरीब माणसे आहेत, त्यांना मदत करण्यासाठी महामंडळांचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. फायदा तोटा हा भाग नाही पण सामान्य लोकांन याचा फायदा होईल. एक चांगलानिर्णय शासनाने घेतला आहे. कोणाला खुश करण्यासाठी नाही, तर वस्तुस्थिती पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, असा प्रस्ताव पाठवला आहे, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

उद्योग भवनला रतन टाटा यांचं नाव

उद्योगपती रतन टाटा यांना जो उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला होता, तो यापुढे रतन टाटा यांच्या नावाने देण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच, मुंबई येथे जे उद्योग भवन बनत आहे, त्यालाही रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. ठाणेरत्नागिरी आदी कामासाठी सीएसआरमधून 500 कोटी रुपये त्यानी दिले होते, नवीन उद्योग भवन हे 700 कोटींचे होत आहे, याला नाव देऊन एक प्रकारे शासकीय श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

Previous Post

रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती

Next Post

बीडच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी फेटाळले शस्त्रपरवाने

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post
बीडच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी फेटाळले शस्त्रपरवाने

बीडच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी फेटाळले शस्त्रपरवाने

ताज्या बातम्या

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

सोयाबीन, तूर, मुगाची आधारभूत किंमत वाढवली…

May 28, 2025

आला रे आला ,मान्सून आला..

May 25, 2025

भारतीय संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल.

May 24, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.