• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

भगवद्गीतेच्या भूमीवर भाजपचा विजय सुशासनामुळे-नरेंद्र मोदी.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 8, 2024
in ताज्या बातम्या
0

हरियाणाता सलग तिसऱ्यांदा कमळ फुललं आहे. भगवद्गीतेच्या भूमीवर सत्य, विकास आणि सुशासनाचा विजय झाला आहे. प्रत्येक जाती आणि धर्माच्या लोकांनी भाजपला मतदान केलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कित्येक दशकांच्या प्रतिक्षेनंतर अखेर शांततेत निवडणूक पार पडली आहे. मतमोजणी झाली, निकाल समोर आले हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाचा विजय आहे असे विजयोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय सभेत काढले.

जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. दिल्लीत भाजपच्या कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला,या कार्यक्रमात नरेंद्र मोदी म्हणाले की, य मतांच्या टक्केवारीनुसार भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. “आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. देवीच्या पूजनाचा दिवस आहे. देवी वाघावर स्वार झालेली आहे , देवीच्या हातात कमळ आहे. देवी आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहे. अशा पवित्र दिनी हरियाणाता सलग तिसऱ्यांदा कमळ फुललं आहे. मतमोजणी झाली, हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि त्यांच्या आघाडीला बहुमत दिले, त्यांचेही अभिनंदन मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर जम्मू-काश्मीरमध्ये जेवढे पक्ष निवडणूक लढवत होते त्यात मतांच्या टक्केवारीनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे” हे मोदींनी स्पष्ट केले.

“मी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विजयी उमेदवार, जम्मू-काश्मीरची जनता यांना शुभेच्छा देतो. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या तप आणि तपश्चर्यासाठी नमन करतो. हरियाणाचा हा विजय कार्यकर्त्यांच्या अफाट परिश्रमाचा परिणाम आहे. हा विजय राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि हरियाणाच्या टीमच्या परिश्रमाने मिळाला आहे. अतिशय नम्र आणि विनम्र मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्याचा हा विजय आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“हरियाणाच्या जनतेने एक नवा इतिहास रचला आहे. हरियाणाची निर्मिती 1966 मध्ये झाली होती. इतक्या वर्षात अनेक मोठमोठ्या दिग्गजांनी या राज्याचं नेतृत्व केलं, ज्यांना संपूर्ण देश ओळखायचा. हरियाणाच्या त्या दिग्गज नेत्यांचं नाव संपूर्ण देशात चर्चेत असायचं. हरियाणात आतापर्यंत 13 निवडणुका झाल्या. त्यापैकी प्रत्येकी 10 निवडणुकीत हरियाणाच्या जनतेने दर पाच वर्षात सरकार बदललं. पण यावेळी हरियाणाच्या जनतेने जे केलं ते अभूतपूर्व आहे. असं आधी कधीच घडलं नाही”, असंही नरेंद्र मोदी म्हणाले , पहिल्यांदाच असं झालं आहे, जेव्हा दोन कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या भाजपा सरकारला हरियाणात तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. हरियाणाच्या नागरिकांनी छप्पर फाड मते दिली आहेत या जनादेशाचा आवाज दूरपर्यंत जाईल ”, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

Previous Post

मोदी-सैनीच्या जादूने हरियाणात भाजपचा करिष्मा.

Next Post

आज नवरात्रीचा सातवा दिवस, देवी कालरात्री ‘या’ राशींना देणार सुख समृद्धी!

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
आज नवरात्रीचा सातवा दिवस, देवी कालरात्री ‘या’ राशींना देणार सुख समृद्धी!

आज नवरात्रीचा सातवा दिवस, देवी कालरात्री ‘या’ राशींना देणार सुख समृद्धी!

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.