सुरजला मिळाले 14 लाख अन ट्रॉफी.
बिगबॉस विजेत्या सूरज चव्हाणने 14 लाख 60 हजार रुपये ,एक इलेक्ट्रिक बाईक आणि ट्रॉफी जिंकीत प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.
100 दिसूस चालणारा बिग बॉसचा शो यंदा अवघ्या ७० दिवसांतच संपला. मात्र या ७० दिवसांतही या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. यंदाच्या पर्वाने ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड्स मोडले आणि नॉन-फिक्शनच्या शोमध्येही सर्वोच्च टीआरपी आणत बाजी मारली. अंकिता प्रभू वालावलर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे सहा जण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे अंतिम दावेदार बनले. या सहा जणांनीदेखील एकमेकांना टक्कर देत आपला इथपर्यंतचा पल्ला गाठला. (Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan)
नुकत्याच पार पडलेल्या महाअंतिम सोहळ्यात सर्वांच्या लाडक्या सूरज चव्हाणने बाजी मारली आणि ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. शोचा होस्ट रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदाची घोषणा करत सूरज चव्हाणचे नाव जाहीर केलं आहे. सूरजला बिग बॉसच्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे. यंदाच्या पर्वाने ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड्स मोडले आणि नॉन-फिक्शनच्या शोमध्येही सर्वोच्च टीआरपी आणत बाजी मारली. अंकिता प्रभू वालावलर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे सहा जण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे अंतिम दावेदार बनले. या सहा जणांनीदेखील एकमेकांना टक्कर देत आपला इथपर्यंतचा पल्ला गाठला.
(Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan)
महाअंतिम सोहळ्यात सर्वांच्या लाडक्या सूरज चव्हाणने बाजी मारली आणि ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. शोचा होस्ट रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदाची घोषणा करत सूरज चव्हाणचे नाव जाहीर केलं आहे. सूरजला बिग बॉसच्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे. मात्र जो जिंकेल असं सर्वसामान्य प्रेक्षकांना वाटत होतं तोच जिंकला म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीलाही न्याय मिळाला आशा भावना व्यक्त होत आहेत.