।।आदिशक्ती।।
नारळ फोडणे यालाच श्रीफळ वाढविणे असेही म्हणतात. नारळ हे शुभ कार्यप्रसंगी, उद्घाटनासाठी किंवा देव देवतांना अर्पण करणे प्रसादासाठी प्रामुख्याने वापरले जाते .सर्वतोपरी बहुउपयोगी हे झाड आणि फळ आहे त्यामुळे याला कल्पवृक्ष म्हटले जाते.
एका रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी “पुरुषांनी नारळ वाढवावं” असा आवाज महिलांमधूनच आला. शुभप्रसंग, वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन तो श्रीफळ वाढवण्याचा विधी संपन्न झाला, पण हा धागा पकडून महिला शक्तीरूपींनी आहे, शक्तीची देवता आणि सामर्थ्य बाळगणारी आहे, ती अबला नाही तर सबला आहे. स्त्री- पुरुष समानता सर्वमान्य आहे तर अशी भेदभावाची मानसिकता पहिले स्त्रीने बाळगूनये, सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर नव्ह सरस ठरत आहेत. एकही क्षेत्र असे नाही की तिथे मुली -महिला कार्यरत नाहीत, हा प्रेरणादायी विचार डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी माता तुळजाभवानी मंदिर परिसरासाठीच्या रस्ता भूमी प्रसंगी येथे व्यक्त केला.
उपस्थित महिला शक्ती जागृत झाली आणि ताईंना टाळ्यांनी मोठा प्रतिसादही दिला.
लोकनेते विनायकराव मेटे यांना स्वर्गीय म्हणावे लागते कारण ते शरीराने आपल्या सोबत नाहीत पण कार्यरूपाने, कर्तुत्वाच्या पाऊल खुणा आणि त्यांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणारे शिवसंग्राम कुटुंब मोठ्या धैर्याने ,एकजुटीने लोकसेवेत आहे. कुटुंबप्रमुख म्हणून डॉ.ज्योतीताई सक्षमपणे आपल्या सौभाग्याच्या आठवणी दाबून शिवसंग्रामच्या सौभाग्यासाठी तरुण पिढीच्या गोरगरीब लोकांच्या सौभाग्यासाठी पदर खेचून मायेचे पांघरून आणि धैर्य- शौर्य ची शिकवण समाजाला देण्यासाठी सक्रिय आहेत .
बीड जिल्ह्याला महिला नेतृत्वाची मोठी ओळख आहेच, सक्षम नेतृत्व करणाऱ्या महिला बीड जिल्ह्याला लाभलेल्या आहेत.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्म वर्ष साजरे होत असताना ,तीनशे वर्षांपूर्वीच्या पुरुषप्रधानकाळात प्रतिकूल परिस्थिती ओढवल्याने अहिल्यादेवींनी धर्म ,राष्ट्र, संस्कार संस्कृतीचे शिकवण देणारे राज्य म्हणून कारभार यशस्वी केला. स्त्री शक्तीरुपींनी म्हणून अनेक आदर्श आपल्यासमोर आहेत.
महाराष्ट्राच्या शौर्य आणि सर्वस्व असलेले छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक ते अनेक लोकोपयोगी उपक्रम स्व.विनायकराव मेटे यांनी महाराष्ट्र राज्य आणि येथील तरुण पिढी सक्षम होण्यासाठी च्या मार्गावर पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. कोणत्याही समाजात मागासले पण असू नये, हा बाणा त्यातच मराठा समाज बांधवातील आर्थिक मागासले पण दूर करण्यासाठीच्या आरक्षण प्रश्नावर त्यांनी संग्राम उभा केला, त्याच कार्यासाठीच्या लढ्यात प्रवासात अपघात झाला आणि शिवसंग्राम परिवारावर जसा दुःखाचा डोंगर कोसळला तसा महाराष्ट्र एका चळवळीच्या नेतृत्वापासून पोरका झाला. यातून सावरणे खूप अवघड असताना शिवसंग्राम परिवाराला आधार मातृशक्तीरूपींनी ताईंनी दिला. आपले दुःख लपवून मेटे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांना धीर देत , धर्म, राष्ट्र समाज कार्य सुरू ठेवले.मेटे साहेबांचा वसा आणि वारसा माॅं जिजाऊ साहेबांचीं प्रेरणा आदर्श समोर ठेवून पुढे सर्व परिवार ,मावळे सवंगडीएक कुटुंब म्हणून पुढे घेऊन जात असल्याने डॉ. ज्योतीताई साहेबांचा अभिमान वाटावा असेच कार्य सुरू आहे.
प्रमोद कुलकर्णी,
पत्रकार बीड