• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 31, 2026
in ऑनलाईन वृत्तसेवा
0
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

मुंबई (प्रतिनिधी ) दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.सुनेत्रा पवार ह्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. लोकभवन येथे झालेल्या या शपथविधीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि आमदार उपस्थित होते. यावेळी ‘अजितदादा पवार अमर रहे’, ‘सुनेत्रा पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!’ अशा घोषणा अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

पवारांकडे कोणती खाती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावर पुढील तीन खात्यांची जबाबदारी सोपवली आहे. क्रीडा विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग या तीन खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवली आहे. अजित पवार यांच्याकडे असलेले वित्त (अर्थ) व नियोजन खाते सध्या सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले नाही. अर्थखात्याबाबत भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अद्याप हिरवा कंदील नसल्याची माहिती सूत्रांकडून कळते.

अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले. या पदावर आज सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. आज दुपारी झालेल्या राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर लगेच सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला.

उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत असल्याची भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. “आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन.” असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

शपथविधीसाठी  घाई का ? भुजबळ म्हणाले…

शपथविधीसाठी इतकी घाई का केली? असा सवाल उपस्थित केला जात असल्याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ”आज चौथा दिवस आहे ठीक आहे, तुम्ही सांगा, किती दिवसांनी शपथविधी करायचा होता?” असा उलट सवाल भुजबळ यांनी पत्रकारांना केला. राज्याला महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. अजितदादांचा अपघात डोळ्यासमोर जात नाही. पण वहिनींनी हे दुःख पचवून पक्षाच्या कामासाठी पुन्हा उभे राहण्याचे ठरवले आहे. ही मोठी गोष्ट आहे, असे ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ”महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करतील.” असे पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ”महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करतील.” असे पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले






सुनेत्रा पवार यांची कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमी

सुनेत्रा अजित पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. त्या राजकारणासाठी नवीन नाहीत, कारण त्यांचे माहेर देखील एका मोठ्या राजकीय घराण्यातील आहे. त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे राज्याचे माजी मंत्री आणि लोकसभा खासदार राहिले आहेत.

महाराष्ट्राच्या


सुनेत्रा पवार यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, पण त्यांना यश मिळालं नाही. तरीही त्यांचा राजकीय प्रवास थांबला नाही. 18 जून 2024 रोजी त्या राज्यसभेच्या सदस्य झाल्या आणि संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सक्रिय भूमिका बजावू लागल्या. आता अवघ्या दोन वर्षांत त्या राज्यातील सर्वात प्रभावशाली महिला नेत्यांच्या रांगेत उभ्या आहेत.


सुनेत्रा पवार यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1963 रोजी महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तेर गावात झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक होते. त्यांचे कुटुंब शेतीशी जोडलेले होते. सुनेत्रा पवार यांनी एप्रिल 1983 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर एस. बी. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज,छत्रपती संभाजीनगर येथून पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी सामाजिक आणि पर्यावरण संबंधित कोर्सही केले आहेत. पुस्तके वाचणे, निसर्गाची फोटोग्राफी करणे आणि चित्रकला हे त्यांचे आवडते छंद आहेत.


राजकारणापूर्वी सुनेत्रा पवार सामाजिक आणि संस्थात्मक कामांमध्ये सक्रिय होत्या. त्या बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क आणि एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया (NGO) च्या अध्यक्षा आहेत. याशिवाय, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यही राहिल्या आहेत. कृषी आणि शिक्षणाशी संबंधित अनेक संस्थांमध्ये विश्वस्त म्हणून त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.


गेल्या 23 वर्षांपासून सुनेत्रा पवार सातत्याने समाजसेवेत कार्यरत आहेत. आरोग्य क्षेत्रात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, कर्करोग जनजागृती अभियान आणि महिलांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन ही त्यांची ओळख बनली आहे. शिक्षण क्षेत्रात विज्ञान मेळावे आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून त्यांनी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावला. याच प्रयत्नांमुळे त्यांना जीवन गौरव पुरस्कार, ग्रीन वॉरियर अवॉर्ड, लोकमत आयकॉन अवॉर्ड आणि राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार 2024 असे अनेक मोठे सन्मान मिळाले आहेत.

राजकारणात प्रत्यक्ष पद स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी सामाजिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. त्यांनी ‘एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना करून सेंद्रिय शेती आणि ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी योगदान दिले आहे. यासोबतच त्या बारामतीमधील महत्त्वाच्या संस्थांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या देखील सांभाळत आहेत.

Previous Post

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.