• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

बीड शहरात प्रथमच भाजप ठरू पाहतोय तुल्यबळ पक्ष.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 16, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, विशेष वार्ता
0
विधानसभेसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर; ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब

बीड (महेश वाघमारे ) पक्षाचे अधिकृत उमेदवार असणं याचाच अर्थ अधिकृत पक्ष चिन्ह घेऊनच निवडणूक लढवणं हे निश्चितच अपक्ष किंवा स्थानिक आघाड्या करून निवडणूक लढवण्यापेक्षा फायद्याचं असतं. प्रत्येक पक्षाची अशी काही मतं निश्चित असतात अन त्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते देखील असतात म्हणून पक्षाचा अधिकृत झेंडा हाती असायलाच हवा.बीड न प निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आवर्जून जाणवते आहे.

बीड म्हंटलं की कुणी मान्य करो न करो क्षीरसागर घरण्याशिवाय विजयाचे गणित जमू शकत नाही, आता जरी या घराण्यात राजकीय मतभेद निर्माण झाले असले तरी दोन्ही घरे ही नक्कीच तुल्यबळ आहेत.क्षीरसागरमुक्त बीड असं बोलणं म्हणजे फक्त त्यांच्याबद्दल वैयक्तिक असूया बाळगणं किंवा तोंडाची वाफ दवडणं एवढाच त्याचा अर्थ.विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी राजकारणात एव्हाना पक्की मांड बसवली आहे तर त्यांचे तुल्यबळ प्रतिस्पर्धी डॉ.योगेश क्षीरसागर हे देखील पराभूत झाल्यानंतरही सक्रिय आहेत,प्रभावी आहेत.उद्याच्या नगर परिषद निवडणूकित यांच्या नेतृत्वाखालील व्यक्तीच यशस्वी होण्याची शक्यता आणि इतिहास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटावर आ.संदीप क्षीरसागर यांचे निर्विवाद वर्चस्व आहे,ते ठरवतील त्यांना उमेदवारी मिळणार आहे, दुसऱ्या बाजूने डॉ.योगेश क्षीरसागर यांनी देखील त्यांच्या पक्षाकडून अशीच अपेक्षा ठेवली होती आणि जी रास्त होती.त्यांच्या (काल पर्यंतच्या) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातच दोन गटात ऐक्य निर्माण करण्याऐवजी गटबाजीला खतपाणी घालण्याणे असा कोणता अधिकचा फायदा अजितदादांनी होणार आहे हे त्यांचे त्यांनाच माहीत.हेही खरे आहे की त्यांच्या पक्षात काही उमेदवार असे आहेत जे त्यांच्या त्यांच्या वार्डात निश्चितपणे विजय मिळवू शकतात पण त्यांचा प्रभाव शहरात सर्वदूर नाहीये.या दुसऱ्या गटाचे नेतृत्व आता गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. आ.पंडितांचे कुटुंब गेली अनेक वर्षे वास्तव्यात बीड शहरात आहेत त्यामुळे त्यांचा स्थानिक नागरिकांशी संबंध आहे पण तो मतदार म्हणून नव्हे पण काही अंशी आहे,क्षीरसागर घराणे येथे कायम प्रभावी राहिले आहे ज्यात दीर्घकाळ नगराध्यक्ष राहिलेल्या डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांचा मोलाचा वाटा आहे.शहराच्या प्रत्येक भागाची आणि त्या भागातील नागरिकांची त्यांना खडा न खडा माहिती आहे,मात्र ते प्रकृती अस्वस्थ्यामुळे राजकारणापासून दूर आहेत.एकूण जर साऱ्याच राजकीय पक्षाचा कानोसा घेतला तर त्यांच्याकडे साऱ्याच वार्डात प्रभावी उमेदवारांची वानवा आहे तर दुसरीकडे प्रत्येक वार्डात किमान दोन तरी आशा व्यक्ती आहेत ज्यांनी त्यांच्या वार्डात प्रभावी संपर्क ठेवून कामे केली आहेत,या व्यक्तींना जे पक्ष उमेदवारी देतील तेथून तेथून ते निश्चित निवडून येण्याची दाट शक्यता आहे. बीड न प च्या अरक्षणामुळे सामाजिक ऐक्य,सौख्य निर्माण होण्यास आणि तो दृढ होण्यास मोठी मदत होणार आहे. अध्यक्षपद एस सी महिला राखीव आणि वार्डात दोन सदस्य वेगळ्या प्रवर्गाचे असणार आहेत त्यामुळे त्या त्या वॉर्डात तिघांना एकत्रपणे निवडणूक लढवावी लागते आहे,प्रचारात त्यांचे सतत एकत्रित राहणे होणार आहे यामुळे गेले काही दिवस जी सामाजिक, जातीय कटुता निर्माण झालेली आहे ती खूप कमी होणार आहे हे या निवडणुकीचे सर्वात मोठे फलित असणार आहे. युती किंवा आघाडी असा प्रयोग बीड शहरात होणार नाही असेच सध्याचे चित्र आहे.पण आज भाजप स्वतंत्र लढण्याचे चित्र आहे कधी नव्हे ते भाजप नव्या समीकरणात या निवडणुकीत प्रभावी ठरू शकण्याची चिन्ह आहेत.बघू विकास वैगेरे नंतरच्या गोष्टी आहेत आज कोण कोण निवडून येतो याचीच उत्सुकता आहे.

Previous Post

Next Post

आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.