• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

भारताच्या लेकी विश्वविजेत्या.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 2, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, क्रीडा विश्व
0

मुंबई- नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) टीम इंडियानं इतिहास घडवला. भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला वन डे विश्वचषकावर (India Wins ICC Womens World Cup 2025) आपलं नाव कोरलं.

या विजयासह कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न साकार केलं. या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुलवार्टनं शतकी खेळी केली केली. पण एका बाजूनं अपेक्षित साथ न लाभल्यानं तिचे प्रयत्न अपुरे ठरले. आणि भारतानं एका ऐतिहासिक विजयाला गवसणी.

शेफाली आणि स्मृती मानधानाची विक्रमी भागीदारी

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय महिला संघाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर स्मृती मानधाना आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी रचली. दोघींनी जबाबदारीने खेळ करत संघाला मजबूत पाया दिला. ही जोडी आणखी मोठी भागीदारी करेल असं वाटत असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत मंधानाला 45 (58) धावांवर माघारी पाठवलं.

चांगली सुरुवात पण मधल्या फळीत अपयश…

मानधना आणि शेफाली यांच्या जोडीने भारताला चांगली सुरुवात करून दिली होती, मात्र त्यानंतर कोणतीही फलंदाज जोडी मोठी भागीदारी करू शकली नाही. त्याचा परिणाम थेट धावफलकावर दिसून आला. स्मृती मानधानाच्या बाद झाल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज 24 (37) धावांवर बाद झाली, तर शेफाली वर्मा 87 (78) धावांवर माघारी परतली. कर्णधार हरमनप्रीत कौरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण त्या फक्त 20 (29) धावा करून बाद झाल्या. अमनजोत कौरने 12 (14) धावा केल्या. रिचा घोषने काही क्षण झळक दाखवत 34 (24) धावांची खेळी केली. शेवटी दीप्ती शर्मा 58 (58) धावा करून अखेरच्या चेंडूवर दुसऱ्या धावेसाठी धावताना धावबाद झाली. अशा प्रकारे भारताने निर्धारित 50 षटकांत 7 गडी गमावून 298 धावा केल्या.

भारताने दिलेल्या 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी लॉरा वोल्वार्ट (कर्णधार) आणि ताजमिन ब्रिट्स ही जोडी मैदानात उतरली. दोघींनी सुरुवातीला संयमाने फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. नवव्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 50 च्या पुढे गेला. मात्र 10व्या षटकात संघाला पहिला धक्का बसला. अमनजोत कौरने ताजमिन ब्रिट्सला रनआउट केले. ब्रिट्सने 23 धावा केल्या. 12व्या षटकात श्री चरणीने दुसरे यश मिळवले, त्यांनी बॉशला शून्यावर माघारी पाठवले. 18व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 100 च्या पुढे गेला. पण 21व्या षटकात शेफाली वर्माने मोठी भागीदारी मोडीत काढत लुसला बाद केले. लुसने 25 धावा केल्या. 23व्या षटकात पुन्हा शेफालीने कमाल दाखवत मरिजाने कॅपला केवळ 4 धावांवर बाद केले.

30व्या षटकात दीप्ती शर्माने जाफ्टाला 16 धावांवर बाद करत दक्षिण आफ्रिकेला पाचवा धक्का दिला. त्यानंतर 40व्या षटकात दीप्तीने आणखी एक महत्त्वाचा विकेट घेतला, एनेरी डर्कसन 35 धावांवर बाद झाली. 42व्या षटकात दीप्तीने भारताला सर्वात मोठे यश मिळवून दिले. तिने दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्टचा शतकानंतरचा मौल्यवान विकेट घेतला. याच षटकात तिने ट्रायोनलाही बाद केले आणि विजय भारताच्या झोळीत घातला. दीप्ती शर्माने या सामन्यात तब्बल 5 विकेट घेतल्या आणि एक रनआउटही केला. तिच्या या अफलातून कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेची संपूर्ण टीम 246 धावांवरच गारद झाली.

Previous Post

आजपासून पटांगण संस्थानचा ४२५ वा उत्सव.

Next Post

न.प.निवडणुका लागल्या, 2 डिसेंबरला मतदान.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

न.प.निवडणुका लागल्या, 2 डिसेंबरला मतदान.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.