• Contact Us
  • Home
Friday, February 6, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

उद्यापासून थोरल्या पाटांगणावर वार्षिकोत्सव.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 29, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, सांस्कृतिक
0


३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर भरगच्च कार्यक्रम.

बीड (प्रतिनिधी)
श्री जनी जनार्दन स्वामी महाराज संस्थान थोरले पाटगंण येथे वार्षिक महोत्सव गुरुवार ३० ऑक्टोबर पासून सुरू होत आहे, विविध धार्मिक कार्यक्रमाने भगवतभक्ती सागराचे रूप धारण करणाऱ्या या बीडच्या श्रद्धा आणि परंपरेच्या उत्सवाचे हे ४२५ वे वर्ष असून ६ नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन भगवतकृपा प्रसादाचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन मठाधिपती श्री विनायक महाराज पाटंगणकर यांनी केले आहे.


गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी श्री ज्ञानेश्वरीच्या अखंड पारायण सेवेने हा उत्सव प्रारंभ होत असून, शुक्रवार ३१ ऑक्टोबर रोजी श्री सोमयागी यज्ञ मार्तंड श्री यज्ञेश्वर महाराज सेलुकर यांच्या उपस्थितीत “श्रीसूक्त हवन” चा भव्य सोहळा, १ नोव्हेंबर रोजी स्थानिक नामवंत कलाकारांची भजन संध्या, दोन आणि तीन नोव्हेंबर रोजी भगवद्गीता पाठांतर स्पर्धा, वय वर्ष 5 ते 11 आणि त्यापुढील दोन अशा गटात या स्पर्धेचे नियोजन केलेले आहे, या दिवशी श्री सज्जनगड चे भूषणस्वामी महाराज यांची उपस्थिती आणि संत पूजन सोहळा होणार आहे, तर मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी वे.शा.सं. धुंडीराज शास्त्री पाटंगणकर स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार सोहळा दुपारी ठीक ४ वाजता संपन्न होणारा आहे. यावर्षी पंडित प्रमोदशास्त्री कुलकर्णी (परभणी) यांना “विद्वन्मणि” हा पुरस्कार आणि भगवद्गीता सेवेतील सौ संध्या कुलकर्णी यांचा सत्कार यावेळी श्री ईश्वर गुरुजी घनपाटी ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे .

दि ५ नोव्हेंबर रोजी गीता पाठ आणि गुरुवार 6 नोव्हेंबर रोजी आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (श्री अमृत महाराज जोशी) यांचे काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद होणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी मठाधिपती श्री विनायक महाराज पाटंगणकर यांच्या लळिताच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.
या वार्षिक महोत्सवात दररोज चतुर्वेद पारायण होणार आहेच, तसेच चातुर्मासाच्या निमित्ताने नित्याचे काकड आरती, पंचामृतपूजा, अभिषेक इत्यादी उपक्रमासोबतच प्रत्येक एकादशी दिवशी गीतापाठ, दर चतुर्थीला अथर्वशीर्ष पाठ असे उपक्रमही पाटंगणावर सुरू असतात. या वर्षीचा हा ४२५ वा वार्षिक महोत्सव आणि त्यातील सप्ताहभर आयोजीत भरगच्च कार्यक्रमातून सर्व भाविक भक्तांनी, समस्त बीडकरांनी सहभागी व्हावे आणि भगवतभक्ती कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

निवडणुका डिसेंबरमध्ये..

Next Post

आजपासून पटांगण संस्थानचा ४२५ वा उत्सव.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

आजपासून पटांगण संस्थानचा ४२५ वा उत्सव.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.