• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

धनत्रयोदशी….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 18, 2025
in सांस्कृतिक
0
धनत्रयोदशी….


धनत्रयोदशी….

नमस्कार…!

दि.१८|१०|२०२५

  *॥ गुरुद्वादशी ॥*
*॥ धनत्रयोदशी ॥*

🟣 *”गुरुद्वादशी”* हा दिवस श्रीपाद श्रीवल्लभांचा निजानंदी गमन दिवस आहे.

🟣 या दिवशी श्रीगुरु दत्तात्रेयांचे पूजन करावे.

🟣 याचा संकल्प:- आचमनादी देशकाल कीर्तनांऽते *सपरिवारस्य मम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धये श्रीपाद श्रीवल्लभ श्रीगुरु दत्तात्रेयरूपी श्रीसद्गुरु प्रीत्यर्थं षोळशोपचारैः पूजनं करिष्ये ।*

असा संकल्प करून; गणेशपूजा, न्यास , कलशपूजा, करावी.

पुढील मंत्रांनी देवाचे ध्यान करावे..

🟣ध्यान मंत्र:-
*ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्ष्यं । एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुण रहितं सद्गुरुं तं नमामि ॥*

*काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्म करेणशंखं । चक्रं गदा भूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये  ॥*

या दोन मंत्रांनी देवाचे ध्यान करून; षोळशोपचार पूजा करावी.

🟣 सांगता सिद्ध्यर्थ ब्राह्मण भोजन घालावे.
पुराणश्रवण करत रात्र व्यतीत करावी.
____________________

🟣 या दिवशी धन्वंतरि देवतेची उत्पत्ती झाली करिता; हा दिवस *धन्वंतरि जयंती* म्हणून प्रसिद्ध आहे.

🟣 या दिवशी निरोगी दीर्घायुष्य मिळविण्यासाठी धन्वंतरि देवतेची पूजा करतात.

🟣काही ठिकाणी वैद्य (डॉक्टर) लोक आपल्याकडे येणा-या रुग्णांना नित्य आरोग्य मिळावे या कामनेने “दैवी उपचार” म्हणून *”धन्वंतरि याग “* नामक “यज्ञ” करतात.

(आपल्या कडे “धन्वंतरि यागाचे” विधान आहे. )

🟣 या दिवशी काही जणांकडे प्रथेनुसार सुवर्ण तसेच स्वयंपाकाची नवीन भांडी विकत आणून त्यात धणे भरून त्याचे पूजन करून;दुस-या दिवशी पासून ती वापरात घेण्याची प्रथा आहे.
____________________

🟣सायंकाळी संध्यावंदनादी झाल्यावर; घरात कोणासही अपमृत्यु येऊ नये म्हणून गव्हाच्या पिठात हळद टाकून केलेला दिवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे ज्योत करून प्रज्वलीत करावा. त्या नंतर; तो दीप यमदेवतेस संकल्प पूर्वक  श्रद्धेने अर्पण करावा.म्हणजे; पुढील एक वर्षात आपल्या घरात कोणासही *असमयी* “अपमृत्यु” येत नाही अशी मान्यता आहे.

या दीप दानाचा विधी..

🟣 संकल्प:-
देशकालौ संकीर्त्य *मम अपमृत्यु विनाशार्थं यमदीप दानं करिष्ये ।*

असा संकल्प करून; दिव्याचे मुख दक्षिणेकडे करून; त्या दिव्यात तिळाचे तेल घालावे.
गंध-अक्षदा-पुष्प इत्यादींनी तो दिवा पूजनाने सुशोभित करत पुढील मंत्राने तो दीप यमदेवतेस अर्पण करावा. 

🟣 मंत्र  :-
*मृत्युना पाशदंडाभ्यां* 
*कालेन श्यामयासह  ।*
*त्रयोदश्यां दीप दानात् सूर्यजः प्रीयतां मम ॥*

🟣 *अनेन दीप दानेन श्रीयमः प्रीयतां !*

इति.. आश्विन कृष्ण त्रयोदश्यां यमदीपदान विधिः ।

🟣 अशाप्रकारे हा दीपदान विधी नरकचतुर्दशीला देखील करावा.
_____________________

🟣 या वर्षी ; या दिवशी  *”शनिप्रदोष”* आहे.
हे “शनिप्रदोषाचे” व्रत केले असतां *संतानप्राप्ति* होते.

श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५

श्रीगुरुदेव दत्त..!

Previous Post

हक्कावर गदा येत असेल तर टक्कर द्यावीच लागेल-भुजबळ

Next Post

यंदाचे लक्ष्मीपूजन कधी; शास्त्र काय सांगते?

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
यंदाचे लक्ष्मीपूजन कधी; शास्त्र काय सांगते?

यंदाचे लक्ष्मीपूजन कधी; शास्त्र काय सांगते?

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.